कोरोनाचा कहर, अब्जाधीशांचे एका आठवड्यात 36 अरब डॉलर्सचे नुकसान
आतापर्यंत कोरोना व्हायरस हा 48 देशात पसरला असून त्याचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर नुकसान झाले आहे.
कोरोना व्हायरसमुळे दिवसेंदिवस मृतांच्या आकड्यात वाढ होण्यासोबत त्याची लागण झाल्याची नवी प्रकरणे समोर येत आहेत. आतापर्यंत कोरोना व्हायरस हा 48 देशात पसरला असून त्याचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर नुकसान झाले आहे. याच पार्श्वभुमीवर शुक्रवारी सेनसेक्समध्ये इतिहासात दुसऱ्यांदा सर्वाधिक मोठी 1448 अंकांनी घसरण झाली. यामुळे जगतील अन्य शेअर बाजावर याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. अमेरिका मार्केट डाउ जोन्समध्ये गेल्या एक आठवड्यात 12 टक्क्यांनी घसरण झाल्याने त 2008 च्या मंदीनंतर सर्वात जास्त आहे. कोरोना व्हायरसचा शेअर मार्केटला फटका बसल्याने गुंतवणूकदारांसह अब्जाधीशांचे पैसे सुद्धा त्यात बुडाले.
जगातील टॉप-5 अब्जाधीशांचे या आठवड्यात 36 अरब डॉलर्सचे नुकसान झाले आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत आणि अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस यांच्या संपत्तीला 12 अरब डॉलर्सचे नुकसान झाले आहे. बेजोस हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेले आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे बिल गेट्स यांच्या संपत्तीला 5.7 अरब डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्यांची एकूण संपत्ती 112.6 अरब डॉलर्स आहे. बर्कशायर हॅथवे यांच्या वॉरेन बफेट याला एकूण 6.1 अरब डॉलर्सचे नुकसान तर फेसबुकचे फाउंडर मार्क जुकरबर्ग यांना 7 अरब डॉलर्सचे नुकसान झाले आहे. टेस्लाचे CEO एलन मस्क यांना एकूण 6.8 अरब डॉलर्सचे नुकसान झाले आहे. नुकसान झाल्याप्रकरणी मस्क हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. यांची एकूण संपत्ती 71.4 अरब डॉलर्स आहे.(जपानच्या किनाऱ्यावरील 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवर आणखी 4 भारतीयांना कोरोना व्हायरसची लागण)
चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 29 नागरिकांचा मृत्यू बुधवारी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याचा आकडा आता सुमारे 2,800 इतका झाला आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशन द्वारे ही ताजी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच जगभरातील तब्बल 44 देशांमध्ये कोरोना व्हायरस धोका पोहोचला आहे. जगभरात 82,000 नागरिक कोरोना व्हायरस बाधित झाल्याचे वृत्त समोर आले आहे.