IPL Auction 2025 Live

Coronavirus: जगभरात कोरोना व्हायरसचा कहर; इटली येथे एका दिवसात तब्बल 475 लोकांचा मृत्यू

चीनमध्ये (China) जन्मलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात आतापर्यंत 7 हजारांहून अधिक लोकांचा मत्यू झाला आहे. तर तब्बल 2 लोकांपर्यंत लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे चीनमध्ये आतापर्यंत सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे.

Coronavirus Outbreak (Photo Credits: Unsplash)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. चीनमध्ये (China) जन्मलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात आतापर्यंत 7 हजारांहून अधिक लोकांचा मत्यू झाला आहे. तर तब्बल 2 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे चीनमध्ये आतापर्यंत सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. परंतु, कोरोना व्हायरसमुळे इटली (Italy) मध्ये केवळ एका दिवसात 475 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सीएनएन न्यूज 18 च्या पत्रकार रूपाश्री नंदा (Rupashree Nanda) यांनी याची माहिती दिली आहे. यामुळे नागिरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक शहरे बंद करण्याची वेळ आली आहे. हवेमार्फत पसरणाऱ्या या संसर्गजन्य रोगाला थांबवण्यासाठी अनेक युरोपीय देशांनी संपूर्ण शहरेच लॉक डाऊन केली आहे. अनेक सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चीनमधील वुहानमधून सुरु झालेला करोनाचा प्रादुर्भाव आता 110 पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जग हादरुन गेले आहे. जगातील बर्‍याच देशांमध्ये साथीच्या रोगासारखी स्थिती आहे आणि डब्ल्यूएचओने देखील भारतात एक साथीचा रोग जाहीर केला आहे. यापासून बचाव करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. कोरोना व्हायरसचा प्रदुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. संपूर्ण देशात कोरोना बाधित रुग्णाची संख्या 147 जाऊन पोहचली आहे. या जागतिक महामारीमुळे चित्रपट, क्रिडा अशा क्षेत्रातील कार्यक्रमांना पूर्णविराम मिळाला आहे. या करोना व्हायरसमुळे प्रत्येकाच्या मनात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच इटली येथे कोरोना व्हायरसची लागण होऊन एका दिवसात तब्बल 475 लोकांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. सीएनएन न्यूज 18 च्या पत्रकारांनी याची माहिती दिली आहे. त्यानुसार, चीनमध्ये मृतांची संख्या जास्त असली तरीदेखील इटली येथे एका दिवसात सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. तसेच कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येक देश टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहे. हे देखील वाचा- रत्नागिरीमध्ये Coronavirus रुग्णाची पुष्टी; राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 45 वर; सरकारने घेतले काही महत्वाचे निर्णय

रुपाश्री नंदा यांचे ट्वीट-

भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. म्हणून प्रत्येकाने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. भारतात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 153 पर्यंत पोहचली आहे. तर यामुळे मृत पावलेल्यांची संख्या 3 झाली आहे.