Coronavirus चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतूनच COVID-19 निर्मिती, आमच्याकडे पुरावा; अमेरिकेचा दावा

यातील 67,682 जणांचा मृत्यू झाला आहे.

U.S. Secretary of State Mike Pompeo | (Photo Credits: IANS)

कोविड 19 (COVID 19) विषाणुची निर्मिती चीनच्या वुहान (Wuhan) प्रांतातील प्रयोगशाळेतूनच झाली आहे, असा ठाम दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो (Affairs Minister Mike Pompeo) यांनी म्हटले आहे की, अमेरिका सरकारकडे ठोस पुरावा आहे की, कोरोना व्हायरस (Coronavirus) निर्मिती ही चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतूनच झाली आहे. या प्रांतातूनच गेल्या वर्षीच्या शेवटच्या म्हणजेच डिसेंबर महिन्यात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला होता. एफ के या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने एबीसी न्यूजशी बोलताना सांगितले की, हा व्हायरस चीनच्या प्रयोगशाळेतूनच आल्याचे आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत. वृत्तसंस्था आएएनएस या वृत्तसंस्थेनेही याबाबत वृत्त दिले आहे.

परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी पुढे म्हटले आहे की, हा व्हायरस मानव निर्मित आहे आणि जगभरातील अनेक वैज्ञानिक आणि अभ्यासकांना, तज्ज्ञांनाही असेच वाटते की, हा व्हायरस मानवनिर्मितच आहे. आम्हाला कोणावर अविश्वास दाखवण्याचे काहीच कारण नाही, असेही परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी म्हटले खरे. मात्र, त्यांनी याचे पुरावे मात्र कोणतेच दिले नाहीत. (हेही वाचा, Coronavirus: अमेरिकेत गेल्या 24 तासांत 1435 कोरोना बाधितांचा मृत्यू)

माइक पोम्पियो ट्विट

माइक पोम्पियो यांनी पुढे म्हटले की, अवघ्या जगाला संक्रमित करण्याचा चीनला इतिहासच आहे. चिनमधील प्रयोगशाळांतील साफसफाई आणि सुरक्षिततेच्या बाबतीत अत्यंत वाईट परिस्थिती आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटीने दिलेल्या आकेडवारीनुसार अमेरिकेत सोमवारपर्यंत कोरोनाचे 1,158,040 आढळले आहेत. यातील 67,682 जणांचा मृत्यू झाला आहे.