Coronavirus: बांगलादेशचे संरक्षण सचिव सचीव अब्दुल्ला अल मोहसीन चौधरी यांचे निधन; कोरोना व्हायरस चाचणी आली होती पॉझिटीव्ह

सचीव अब्दुल्ला अल मोहसीन चौधरी यांच्यावर ढाका येथील सैनिकी रुग्णालयात (Dhaka's Combined Military Hospital (CMH)) उपचार सुरु होते.

Coronavirus | Representational Image | (Photo Credit: PTI)

बांगलादेशचे संरक्षण सचिव अब्दुल्ला अल मोहसीन चौधरी (Abdullah Al Mohsin Chowdhury) यांचे सोमवारी (29 जून 2020) निधन झाले. त्यांची कोरोना व्हायरस चाचणी (Coronavirus) पॉझिटिव्ह आली होती. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले. बांगलादेश सरकारने चौधरी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्राप्त माहितीनुसार ढाका (Dhaka) येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना चौधरी यांचे निधन झाले.

सचीव अब्दुल्ला अल मोहसीन चौधरी यांच्यावर ढाका येथील सैनिकी रुग्णालयात (Dhaka's Combined Military Hospital (CMH)) उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच सोमवारी सकाळी 9.30 वाजता त्यांचे निधन झाले अशी माहिती, बांगलादेश संरक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव Selina Haque यांनी दिली. Selina Haque दिलेल्या माहितीनुसार, सचीव अब्दुल्ला अल मोहसीन चौधरी यांना 29 मे या दिवशी ढाका येथील सैनिकी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या वेळी त्यांना श्वसन आणि इतरही काही त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांची कोरोना व्हायरस चाचणी करण्यात आली. जी पॉझिटीव्ह आली. (हेही वाचा, Coronavirus Update: जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 1 कोटी च्या पार; अमेरिका, भारतासह सर्वाधिक फटका बसलेल्या Top 5 देशांची यादी पहा)

दरम्यान, रुग्णालयाचे व्यवस्थापकीय अधिकारी भासानी मिर्झा (Bhasani Mirza) यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, 6 जूनपासून अब्दुल्ला अल मोहसीन चौधरी यांचीप्रकृती अधिकच खालावत गेली. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. चौधरी यांना बांगलादेश सरकारने जानेवारी 2020 मध्ये संरक्षण सचिव तर 14 जून पासून वरिष्ठ संरक्षण सचिव बनवले होते.