Anal Swab for COVID-19: विदेशी प्रवाशांच्या कोरोना चाचणीसाठी गुदा स्वॅब अनिवार्य, चीन सरकारचा विचित्र निर्णय

जपान, अमेरिकेने चीनचे हे धोरण म्हणजे एक अशोभनीय प्रकार असल्याचे म्हटले आहे. चीनच्या या नव्या चाचणीमुळे नागरिकांना अनेक अडचणी आणि अवघडलेपणाचा सामना करावा लागू शकतो.

Anal Swab | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणीसाठी आतापर्यंत आपण नाक आणि घसा आदींमधून स्वॅब घेतल्याचे पाहिले असेल. परंतू,आता चक्क व्यक्तीचा गुदा स्वॅबही (Anal Swab for COVID-19) घेतला जाणार आहे. भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या चीनमध्ये अशा प्रकारे स्वॅब घेतला जात आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचा गुदा स्वॅब (Anal Swab) घेणे बंधनकारक आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अशा प्रकारची चाचणी केवळ विदेशी नागरिकांसाठी बंधनकारक आहे. त्यामुळे चीनने आपल्या प्रत्येक विमानतळावर अशा प्रकारचा स्वॅब घेणे बंधनकारक केले आहे. चीनच्या या प्रकारामुले जगभरातील अनेक देश नाराज झाले आहेत. अनेकांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे.

सांगितले जात आहे की, कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी अशा प्रकारची टेस्ट घेण्याची सुरुवात जानेवारीच्या अखेरीपासून करण्यात आली. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य कमीशनने केलेल्या शिफारशीनुसार ही टेस्ट सुरु करण्यात आली आहे. कमीशनने दावा केला आहे की, व्यक्तीच्या गुदद्वारातून घेतलेला स्वॅब हा नाक अथवा घशातून घेतलेल्या स्वॅबपेक्षा अधिक योग्य आणि परिणामकारक असतो. (हेही वाचा, Russia: काय सांगता? माणसांमध्ये आढळला Bird Flu; जगातील पहिल्या घटनेची रशियामध्ये नोंद)

एक इंग्रजी वृतपत्र द टाईम्सने दिलेल्या वृत्तानसार, आता ही खास चाचणी बींजिंग आणि शांघाईच्या विमानतळांवर मोठ्या प्रमाणावर सेंटर्स उभारण्यात आली आहेत. बीजिंगच्या रेस्पिरेटरी डिसीज डिपार्टमेंटचे डायरेक्टर ली तॉन्गजेन यांनी वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत याबाबत माहिती दिली होती. त्यांनी म्हटले होते की, कोरोना व्हायरस हा घशापेक्षा गुदद्वारात अधिक काळ राहतो. त्यांनी असेही म्हटले होते की, गुदा स्वॅब हे त्या लोकांचे घेतले पाहिजे ज्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आल आहे. या लोकांच्या घशाचा नमुना (स्वॅब) घेणे अनेकदा अडचणीचे असते. अशा वेळी त्यांचा गुदा स्वॅब घेणे सोपे ठरु शकते.

दरम्यान, चीनच्या या नव्या धोरणाबाबत जपान आणि अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली आहे. जपान, अमेरिकेने चीनचे हे धोरण म्हणजे एक अशोभनीय प्रकार असल्याचे म्हटले आहे. चीनच्या या नव्या चाचणीमुळे नागरिकांना अनेक अडचणी आणि अवघडलेपणाचा सामना करावा लागू शकतो.