Coronavirus: जगभरातील 52 देशांतील 22 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना COVID-19 संसर्ग- जागतिक आरोग्य संघटना

यात डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय आणि रुग्णालयातील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

WHO Logo

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटात केवळ सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर वैद्यकीय कर्मचारीही होरपळत आहेत. जगभरातील सुमारे 52 देशांतील 22 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना COVID-19 विषाणू संसर्ग झाला आहे. जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) अर्थातच डब्ल्यूएचओ (WHO) ने ही माहिती दिली आहे. वृत्तसंस्था सिन्हुआचा हवाला देत एएनआयने म्हटले आहे की, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, 8 एप्रिल 2020 (बुधवार) पर्यंत जगभरातील 22 हजार वैद्यकीय कर्मचारी कोरोना व्हायरस बाधित असल्याची माहिती आहे. यात डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय आणि रुग्णालयातील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

या वृत्तात दावा करण्यात आला आहे की, जगभरातील वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरस लागण झाल्याचा सांगण्यात आलेला आकडा हा वास्तवापेक्षा बराच कमी आहे. वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी कोरोना व्हायरस लागण झालेल्या कर्मचाऱ्यांची नीट माहिती आणि आकडेवारी उपलब्ध करुन देण्यात आली नाही. (हेही वाचा, Lockdown: अन्न, औषधं खरेदी करण्यासही नाहीत पैसे; 62.5% लोकांना सतावतेय आर्थिक तंगी)

अगदी सुरुवातीचा काळ पाहिला तर आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी हे विविध ठिकाणी असलेल्या गर्दीच्या ठिकाणी गेल्यामुळेही काहींना संसर्ग झाला आहे. तसेच, काही कोरोना व्हायरस कॅरीअर असलेलेल लोक या वैद्यकीक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आल्यामुळेही कोविड 19 संसर्गाचे कारण ठरले आहेत, असेही डब्ल्यूएचओचे म्हणने आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस नियंणासाठी डब्ल्यूएचओने मास्क, चश्मे, योग्य आणि सुरक्षित कपडे तसेच आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यावर भर दिला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif