ई-कॉमर्स कंपनी Amazon मध्ये कोरोना विषाणूचा हाहाकार; तब्बल 20,000 कर्मचाऱ्यांना COVID-19 चा संसर्ग

या काळात फार मोजक्या कंपन्या त्यांच्या पूर्ण क्षमतेने चालू होत्या. यातीलच एक म्हणजे, ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon). आता अ‍ॅमेझॉनने सांगितले आहे की, अमेरिकेत त्यांच्या सुमारे 20,000 कामगारांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे

प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

सध्या जगभरामध्ये कोरोना विषाणूने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. या काळात फार मोजक्या कंपन्या त्यांच्या पूर्ण क्षमतेने चालू होत्या. यातीलच एक म्हणजे, ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon). आता अ‍ॅमेझॉनने सांगितले आहे की, अमेरिकेत त्यांच्या सुमारे 20,000 कामगारांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे किंवा लागण होण्याची शक्यता आहे. कंपनीने प्रथमच कोरोना संक्रमणाची संख्या नमूद करीत म्हटले आहे की, त्यांच्या कर्मचार्‍यांमधील संसर्गाचे प्रमाण अमेरिकेच्या लोकसंख्येच्या तुलनेत सामान्यत: कमी आहे. कोविड-19 संक्रमित लोकांची संख्या उघड करण्याबाबत, अ‍ॅमेझॉनचे कर्मचारी आणि कामगार गट कंपनीवर दबाव आणत होते.

आता कंपनीने कॉर्पोरेट ब्लॉगमध्ये खुलासा केला की, त्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना माहिती पुरविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही संख्या उघड केली आहे. कंपनीने असेही सांगितले, ‘आम्हाला अशी अपेक्षा आहे की इतर मोठ्या कंपन्यांनी देखील त्यांच्या संक्रमित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येविषयी सविस्तर माहिती जाहीर करावी, कारण असे केल्याने आम्हाला सर्वांना मदत होईल.' अमेरिकेतील संपूर्ण फूड मार्केट किराणा दुकानात काम करणाऱ्या कर्मचार्‍यांसह एकूण 10.3 लाख कर्मचार्‍यांच्या मानाने हे संसर्गाचे प्रमाण कमी आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे.

1 मार्च ते 19 सप्टेंबर या कालावधीत, अमेरिकेतील ‘अ‍ॅमेझॉन आणि संपूर्ण फूड मार्केट’ मधील 13 लाख 70 हजार कर्मचाऱ्यांमध्ये झालेले हे संसर्गाचे प्रमाण आहे. सिएटलस्थित कंपनीने असे म्हटले आहे की, चाचण्यांचे प्रमाण वाढवून 650 ठिकाणी दररोज 50,000 चाचण्या घेतल्या जात आहेत. गुरुवारी अ‍ॅमेझॉनने ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले की, 'हे संकट सुरु होताच आम्ही आमच्या कर्मचार्‍यांया विषाणूबाबत सर्व माहिती देण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत.’ (हेही वाचा: Disney ने थीम पार्क मधील 28000 कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता; कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर कंपनीचा मोठा निर्णय)

दरम्यान, अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प (Donald Trump) आणि त्यांची  पत्नी मेलेनिया ट्र्म्प (Melania Trump) यांना कोरोना विषाणूची लागणं झाली आहे. सध्या दोघेही क्वारंटाइनमध्ये आहेत.