Monkeypox Virus Spread: ब्रिटनमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा कम्यूनिटी स्प्रेड सुरू; सरकार हाय अलर्टवर

परंतु, तरीही ते या आजाराला बळी पडत आहेत. या आजाराशी लढा देणाऱ्या लोकांचा दैनंदिन डेटा गोळा केला जात आहे.

Monkeypox Representative Image( Pic Credit-ANI)

Monkeypox Virus Spread: कोरोनानंतर जग एका नवीन प्रकारच्या आजाराच्या विळख्यात सापडले आहे. या आजाराचे नाव मंकीपॉक्स (Monkeypox) आहे. ज्याचा आता कम्यूनिटी स्प्रेड (Community Spread) सुरू झाला आहे. ब्रिटनमधील आरोग्य संस्थेच्या म्हणण्यानुसार, देशात मंकीपॉक्स विषाणूचा प्रसार सुरू झाला आहे. UKHSA चे मुख्य वैद्यकीय सल्लागार सुसान हॉपकिन्स म्हणाले, आम्ही अशा प्रकरणांचा शोध घेत आहोत ज्या व्यक्तीचा पश्चिम आफ्रिकेतील कोणाशीही संपर्क नाही. परंतु, तरीही ते या आजाराला बळी पडत आहेत. या आजाराशी लढा देणाऱ्या लोकांचा दैनंदिन डेटा गोळा केला जात आहे. सुसान हॉपकिन्सच्या मते, हा आजार ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात वेगाने पसरत आहे.

या आजाराबाबत लोकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितलं की, बहुतांश प्रौढ व्यक्तींमध्ये या आजाराची लक्षणे सौम्य असू शकतात. त्यामुळे मंकीपॉक्सच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात तक्रार करा आणि डॉक्टरांशी संपर्क साधा. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये 7 मे रोजी नुकत्याच नायजेरियाला गेलेल्या रुग्णामध्ये या आजाराची लक्षणे प्रथमच दिसून आली. हळूहळू हा रोग आता युरोप आणि उत्तर अमेरिकेतही पसरत आहे. (हेही वाचा - Monkeypox Outbreak: 11 देशांमध्ये मंकीपॉक्सच्या 80 संक्रमित रुग्णांची नोंद; भारतालाही धोका, WHO चे संशोधन सुरू)

मंकीपॉक्स विषाणू संक्रमित व्यक्तीने वापरलेले बेड किंवा टॉवेल पुन्हा वापरल्याने पसरतो. या आजाराची ताप, स्नायू दुखणे, थंडी वाजून येणे, थकवा येणे आणि हात आणि चेहऱ्यावर कांजिण्यासारखे पुरळ येणे ही लक्षणे आहेत.

या आजारावर स्वतंत्र उपचार नाही. परंतु, मंकीपॉक्स रोखण्यासाठी चेचकांवर लसीकरण 85 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. यूकेचे अधिकारी नदीम जाहवी यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने चेचक लसीचा साठा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.