Badminton Player Dies on Court: सामना खेळताना कोर्टवर कोसळला, 17 वर्षीय चिनी बॅडमिंटनपटूचा मृत्यू; PV Sindhu कडून दु:ख व्यक्त
तो अवघा 17 वर्षांचा होता. इंडोनेशिया येथील एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान सामन्यातील सहभागी खेळाडू म्हणून कामगिरी करतानाच तो अचानक कोर्टवर कोसळला. त्याला वैद्यकीय मदत देऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चिनी बॅडमिंटनपटू (Badminton) झांग झिजिए (Zhang Zhijie) याचा मृत्यू झाला आहे. तो अवघा 17 वर्षांचा होता. इंडोनेशिया येथील एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान सामन्यातील सहभागी खेळाडू म्हणून कामगिरी करतानाच तो अचानक कोर्टवर कोसळला. त्याला वैद्यकीय मदत देऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू (Chinese Badminton Player Dies After Collapsing on Court) झाला. झांग आशिया ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये जपानच्या काझुमा कावानोविरुद्धच्या सामन्यात खेळत असताना पहिल्या गेममध्ये 11-11 अशी बरोबरी असताना तो अचानक जमिनीवर पडला.
मृत्यूचे कारण अस्पष्ट
झांग याला घटनास्थळी तत्काळ उपचार मिळाले आणि त्वरीत रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेण्यात आले. परंतू, त्याचे प्राण वाचविण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. स्थानिक वेळेनुसार 23:20 वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले. मृत्यूचे कारण अद्याप अज्ञात आहे. बॅडमिंटन आशिया आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडोनेशिया (PBSI) चे संयुक्त निवेदन सोमवारी प्रसिद्ध झाले. ज्यामध्ये म्हटले आहे की, "चीनचा एकेरी खेळाडू झांग झिजी, संध्याकाळी एका सामन्यादरम्यान कोर्टवर कोसळला. "त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले जिथे त्याचे निधन झाले. त्याला स्पर्धेचे डॉक्टर आणि वैद्यकीय पथक उपस्थित होते. त्याला अवघ्या दोन मिनिटांत स्टँडबाय ॲम्ब्युलन्समध्ये नेण्यात आले आणि हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. मात्र, प्रतिभावान खेळाडूचा मृत्यू झाला." (हेही वाचा, Mumbai: क्रिकेट खेळताना हृदय विकाराचा झटका आल्याने तरुणाचा मृत्यू, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद)
प्रतिभावान खेळाडू गमावल्याची भावना
असोसिएशनने एका निवेदनात सांगितले की, झांग एक आश्वासक ॲथलीट होता. त्याने लहानपणीच बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली आणि गेल्या वर्षी चीनच्या राष्ट्रीय युवा संघात सामील झाला. या वर्षाच्या सुरुवातीला, त्याने प्रतिष्ठित डच ज्युनियर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकावले. "झांग झिजीला बॅडमिंटनची आवड होती आणि राष्ट्रीय युवा बॅडमिंटन संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू होता. स्थानिक रुग्णालयाने अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट केले नाही. (हेही वाचा, Death While Playing PUBG Game: पब्जी गेम खेळताना नागपूर येथील तरुणाचा मृत्यू; वाढदिवस ठरला अखेरचा)
दरम्यान, झांगच्या सन्मानार्थ या स्पर्धेत सोमवारी काही क्षण मौन पाळण्यात आले आणि चिनी संघाने त्याच्या सन्मानार्थ काळ्या फिती हाताला बांधल्या. भारतीय बॅडमिंटन स्टार पी.व्ही. ऑलिम्पिक रौप्य आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने झांगच्या मृत्यूला "ह्रदयद्रावक" म्हटले आणि तिच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. "जगाने आज एक उल्लेखनीय प्रतिभा गमावली आहे," असे सिंधूने X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले. त्यासोबतच जगभरातील बॅडमिंटन समुदायाने या तरुण प्रतिभेच्या नुकसानाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अत्यंत कठीण अशा या काळात झांग झिजीच्या कुटुंबास मनापासून सहानुभूती व्यक्त केली आहे. त्याच्या कुटुंबीयांना सावरण्याचे बळ मिळो आमच्या सर्व संवेदना त्याच्या कुटुंबीयांसोबत असल्याचे झांगच्या चाहत्यांनी म्हटले आहे.