भारतात अरुणाचल प्रदेश दाखवणारे नकाशे चीन देशाकडून नष्ट
तैवान (Taiwan) हा स्वतंत्र देश आणि अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) हे भारतात दाखवणारे नकाशे चीनकडून (China) नष्ट करण्यात आले आहेत.
तैवान (Taiwan) हा स्वतंत्र देश आणि अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) हे भारतात दाखवणारे नकाशे चीनकडून (China) नष्ट करण्यात आले आहेत. जवळजवळ 30 हजार नकाशे गेल्या आठवड्यात इशान्येकडील शहरात सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी हे नकाशे नष्ट केले असल्याचे सांगितले आहे.
प्रादेशिक अखंडता कायम ठेवण्यासाठी नकाशे नष्ट करण्यात आले असल्याचे चीनकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अनहुई प्रांतामधील एका चीनी कंपनीने हे इंग्रजीमधील नकाशे बनवले होते. त्यामध्ये अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूभाग असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे. तसेच दक्षिण तिबेटचा हिस्सा म्हणून अरुणाचल प्रदेश असल्याचे चीनची मान्यता आहे.(हेही वाचा-अमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर)
शेडोंगे प्रांतामधील किंगदाओ शहरामधील कंपनीवर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी छापा टाकत 800 बॉक्स जप्त केले. या बॉक्समध्ये 28,908 जागतिक नकाशे सापडले. तर हे सर्व नकाशे एका गुप्त ठिकाणी नेऊन नष्ट करण्यात आले असल्याचे ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.