China मध्ये आता तीन मुलांना जन्म देण्यास नागरिकांना परवानगी, 'या' कारणामुळे जिनपिंग सरकारने बदलले नियम
त्यांनी आता अशी घोषणा केली आहे की, चीनमध्ये नागरिकांना दोन ऐवजी तीन मुलांना जन्म देण्यास परवानगी असणार आहे.
जगातील वाढती लोकसंख्या ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. याच कारणास्तव फूड्स ते आरोग्यासह अन्य काही क्षेत्रांना संघर्ष करावा लागत आहे. तसेच जगातील लोकसंख्या नियंत्रणात रहावी याचा सुद्धा प्रयत्न केला जात आहे. अशातच चीन मधील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. खरंतर चीन (China) मध्ये दोन मुलांना जन्म देण्याचा कायदा आता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आता अशी घोषणा केली आहे की, चीनमध्ये नागरिकांना दोन ऐवजी तीन मुलांना जन्म देण्यास परवानगी असणार आहे.(Canada: धक्कादायक! बंद असलेल्या बोर्डिंग स्कूलच्या आवारात मिळाले 215 मुलांचे अवशेष; आतापर्यंत मृत्यू झालेल्या 4100 मुलांची ओळख पटली)
शासकीय मीडिया झिंहुआ यांच्या मते, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पोलिस ब्युरो मिटींगमध्ये या कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यामागील कारण असे की, जगनगणना आहे. त्यामुळे असे समोर आले की, चीनच्या जनसंख्येत वाढ झाली आहे. जी गेल्या दशकात फार कमी होती. याच कारणामुळे देशाची राजधानी बीजिंग वर जनसंख्या वाढवण्यावर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे घटणाऱ्या लोकसंख्येवर लगाम लावला जाईल.(Kim Jong-Un ची क्रूरता; व्यक्तीला शिक्षा म्हणून 500 लोकांसमोर घातल्या गोळ्या; कुटुंबाला जबरदस्तीने पाहायला लावले दृश्य, जाणून घ्या काय होता गुन्हा)
दरम्यान, गेल्या वर्षात जवळजवळ 1 कोटी 2 लाख मुलांचा जन्म मे महिन्याच्या सुरुवातीला झाल्याचे जनगणनेच्या रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते. 2016 च्या आकडेवारीच्या तुलनेत ही उल्लेखनीय घट आहे. तसेच 1960 पासून ते आतापर्यंतचा जन्मदर पाहता तर त्यात सुद्धा सर्वाधिक मोटी घट झाली आहे. असे समजले जात आहे की, जनगणनेचा डेटा समोर आल्यानंतर चीन कडून परिवार नियोजनाच्या नितीमध्ये बदल करण्यात आला आहे.