McDonald's मधून तरुणीला Extra Tomato Ketchup नाही दिला म्हणून मॅनेजरला मारहाण
कॅलिफोर्नियामध्ये एका 24 वर्षीय तरुणीने मॅकडोनल्ड (McDonald's) मधून एक्स्ट्रा टॉमेटो सॉस न दिल्याने चक्क मॅनेजरला मारहाण केल्याची विचित्र घटना घडली आहे.
California : एका 24 वर्षीय तरुणीने मॅकडोनल्ड (McDonald's) मधून एक्स्ट्रा टॉमेटो सॉस न दिल्याने चक्क मॅनेजरला मारहाण केल्याची विचित्र घटना घडली आहे. तसेच या तरुणीने मॅनेजरचा गळा आवळत त्याला खूप शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे.
मायरा असे या 24 वर्षीय तरुणीचे नाव आहे. तिने ड्राईव्ह थ्रु (Drive Through) या घरपोच खाद्यपदार्थ विकणाऱ्या संकेतस्थळावरुन खाण्याची ऑर्डर दिली होती. तसेच आलेल्या पार्सलमध्ये तिने मॅकडोनल्डमधून खाण्यासाठी मागवले होते. परंतु या पार्सलमध्ये एक्स्ट्रा सॉस (Extra Tomato Ketchup) नसल्याने मायराने संताप व्यक्त केला. तर ज्या मॅकडोनल्डमधून खाण्यासाठी मागवले होते त्या ठिकाणी ती रागाने तेथे पोहचली. या चिडलेल्या मायराने चक्क मॅनेजरला जाब विचारत त्याला मारहाण केली. तसेच त्याच्या नाकावर जोरात ठोसा मारला.
या प्रकरणी संतापलेल्या मायराला शांत करण्यासाठी तेथील कर्मचारी पुढे आले. तसेच मारहाण करताना तिला आवरले आणि पोलिसांचा स्वाधीन करण्यात आले.