California: डेविस सेंन्ट्रल पार्कातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना, Hate Crime चा तपास करण्याची मागणी
काही अज्ञात व्यक्तींनी हे काम केल्याचे बोलले जात आहे.
California: अमेरिकेतील कॅलिफोर्निया मधील डेविस सेंन्ट्रल पार्कात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड करत तो पाडण्यात आला आहे. काही अज्ञात व्यक्तींनी हे काम केल्याचे बोलले जात आहे. घटना समोर आल्यानंतर देशभरात भारतीय-अमेरिकेकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाला द्वेष गुन्ह्याचे नाव देत अधिकाऱ्यांनी आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेत त्यांना शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.(US Capitol Violence: ट्रम्प समर्थकांकडून झालेल्या हिंसाचारी आंदोलनात एका महिलेचा मृत्यू; Twitter, Facebook आणि Youtube कडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई)
डेविस सेंन्ट्रल पार्कात महात्मा गांधीजींचा 6 फूट उंच आणि जवळजवळ 300 किलो वजनाचा पुतळा होता. पण आता पाहून असे वाटते की तो खालच्या बाजूने कापला गेला आहे. चेहरा सुद्धा विद्रुप करण्यात आला आहे. 27 जानेवारीला सकाळी एका कर्मचाऱ्याला हा पुतळा पडलेला दिसला. डेविसचे काउंसिलमॅन लूकस फ्रेरीश यांच्या मते तपास करेपर्यंत पुतळा हटवला जाणार आहे. तपास करणाऱ्यांना अद्याप माहिती नाही की, पुतळा नेमका कोणत्या कारणामुळे पाडला गेला आहे.
पोलीस विभागातील डेप्युटी चीफ पॉल डोरशोव यांचे असे मानणे आहे की, शहरातील एका समुदायासाठी या पुतळ्याचे सांस्कृतिक महत्व आहे. अशातच याच्या गंभीरतेला समजू शकतो. ही मूर्ती भारत सरकारने डेविस यांना दान केली होती. तर भारतातील अल्पसंख्यांकांच्या संगठनेने याचा विरोध केला असून तो हटवावा अशी मागणी केली आहे.(Zaki-ur-Rehman Lakhvi Arrested: 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि LeT ऑपरेशन्स कमांडर झाकी-उर-रहमान लखवीला पाकिस्तानमध्ये अटक: Official)
दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटी इंटरनॅशनलचे गौरांग देसाई यांनी म्हटले की, भारत विरोधी आणि हिंदूंच्या विरोधातील संगठनांसह खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी द्वेषाचे वातावरण निर्माण केले आहे. या घटनेचा तपास द्वेष गु्न्ह्यानुसार करावी अशी मागणी केली जात आहे. पण कॅलिफोर्नियातील खलिस्तान समर्थकांच्या एका संगठनेने यावर आनंद व्यक्त केला आहे. याआधी सुद्धा येथे महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. डिसेंबर 2020 मध्ये खलिस्तान