इजिप्तमध्ये पर्यटकांच्या बसला अपघात; भारतीय पर्यटकांसह 6 जणांचा मृत्यू, 24 जखमी
या अपघातात भारतीय पर्यटकांसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 24 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 मलेशियन महिला, 1 भारतीय पर्यटक आणि इजिप्तमधील 3 नागरिकांचा समावेश आहे. भारतीय दूतावासाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
इजिप्तमध्ये (Egypt) पर्यटकांच्या बसला अपघात (Bus Accident) झाला आहे. या अपघातात भारतीय पर्यटकांसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 24 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 मलेशियन महिला, 1 भारतीय पर्यटक आणि इजिप्तमधील 3 नागरिकांचा समावेश आहे. या पर्यटन बसमध्ये 16 भारतीयांचा समावेश होता. भारतीय दूतावासाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
इजिप्तमधील सोखनाजवळ पर्यटकांच्या बसला ट्रकने जोरादार धडक दिली. या अपघातात 6 जणांवर काळाने झडप घातली आहे. तर 24 जण गंबीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रग्णालयात उपचार सुरु आहेत. ट्रकच्या जोरदार धडकेमुळे बस चालक तसेच टूर गाईड आणि सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे, असे भारतीय दूतावासकडून सांगण्यात आले आहे. (हेही वाचा - वर्धा: क्रिकेट सामना खेळून परत जाणाऱ्या 2 क्रिकेटपटूंचा रस्ते अपघातात मृत्यू)
भारतीय दूतावासने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना ट्विटरवर टॅग करून याबात माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये 20-1211299905 आणि 20-1283487779 हे 2 हेल्पलाइन नंबर देण्यात आले आहेत.