ब्राझील राष्ट्राध्यक्ष Jair Bolsonaro यांनी Hydroxychloroquine च्या मदतीसाठी मानले PM Narendra Modi यांचे आभार!
Jair Bolsonaro या ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी 'Hydroxychloroquine च्या निर्मितीसाठी भारत कच्चा माल पुरवण्यास मदत करत आहे.
जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोना व्हायरस आता झपाट्याने फैलावत आहे. अशामध्ये या व्हायरसमुळे जीवघेण्या कोव्हिड 19 आजारावर ठोस लस, औषध नसताना Hydroxychloroquine ही मलेरियावरील औषधं काही प्रमाणात फायदेशीर आहे. सध्या भारताकडे या औषधाचा मुबलक साठा असल्याने जगात इतर देशांना कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर आटोक्यात ठेवण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. अमेरिकेपाठोपाठ ब्राझीलनेदेखील आता या मदतीसाठी भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. Jair Bolsonaro या ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी 'Hydroxychloroquine च्या निर्मितीसाठी भारत कच्चा माल पुरवण्यास मदत करत आहे. त्यांच्याशी थेट बोलणं झाल्याने आता आपल्याला कोव्हिड 19 चा सामना करण्यासाठी Hydroxychloroquine ची निर्मिती वाढवण्यास मदत होणार आहे' असा दिलासा त्यांनी नागरिकांना दिला आहे. US President Donald Trump कडून PM नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक; Hydroxychloroquine च्या मदती बद्दल मानले भारतीयांचे आभार!
ब्राझीलमध्ये 16,188 जणांना कोरोनाची लागण झाली असून मृतांचा आकडा 800 च्या पार पोहचला आहे. काल (8 एप्रिल) हनुमान जयंती दिवशी Jair Bolsonaro यांनी रामायणातील खास दाखला देत जसा हनुमानाने लक्ष्मणाच्या उपचारासाठी संजिवनीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता, प्रभू येशूंनी आजाराची लोकांची मदत केली होती त्याप्रमाणेच आता कोरोना व्हायरसच्या या संकटात भारत आणि ब्राझील ने एकमेकांना साथ द्यायला हवी. यामुळे कोरोनाच्या संकटावर मात करता येईल. लोकांच्या मदतीने चांगले आशीर्वाद घेऊन आपण हा आजार संपवू शकतो. अशा विश्वास त्यांनी नरेंद्र मोदींना लिहलेल्या पत्रामध्ये केला होता. सध्या भारताने काही औषधांवरील निर्यातीची बंधनं शिथील केली आहेत.
ANI Tweet
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनीदेखील भारताचे Hydroxychloroquine च्या मदतीबद्दल आभार मानले आहेत. सोबतच भारताचे पंत नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वगुणांचेही कौतुक करताना त्यांना 'टेरिफिक' म्हटले आहे. आज भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीदेखील स्पेनचे परराष्ट्र मंत्री Arancha Gonzalez यांच्याशी बोलून कोरोनाला रोखण्यासाठी जागतिक एकतेच्या माध्यमाची गरज असल्याचं सांगत औषधांची गरज भारताकडून पोहचवली जाईल याबाबत आश्वस्त केले आहे.