Boyfriend on Salary: 15 लाख घे आणि मला हवे तेच कर! महिलेने पगारावर ठेवला 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेंड
अनेकवेळा आपण पती-पत्नी किंवा बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडमध्ये 10 हून अधिक वर्षांचे अंतर पाहिले आहे. विशेषतः परदेशात तर अशी अनेक नाती सापडतील.
आजकाल प्रेम आणि नात्यामध्ये वयातील अंतराचा (Age Difference) जास्त फरक पडत नाही. अनेकवेळा आपण पती-पत्नी किंवा बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडमध्ये 10 हून अधिक वर्षांचे अंतर पाहिले आहे. विशेषतः परदेशात तर अशी अनेक नाती सापडतील. सध्या असेच एक नाते सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. 44 वर्षीय ज्युलीने (Julie) आपल्या 15 वर्षांनी लहान असणाऱ्या आपल्या बॉयफ्रेंडसोबतच्या नात्याबाबत भाष्य केले आहे. महत्वाचे म्हणजे यावेळी तिने सांगितले आहे की, ती तिच्या 29 वर्षांच्या प्रियकराला दर महिन्याला निश्चित पगार (Salary) देते.
The Sun ने याबाबत वृत्त दिले आहे. TikTok वर आपल्या नातेसंबंधाबद्दल माहिती देताना ज्युली म्हणाली, की तिच्या बॉयफ्रेंडला दर महिन्याला जवळजवळ 15 लाख पगार देते. या बदल्यात आपल्याला जे हवे ते ती त्याच्याकडून करून घेते. अगदी स्वयंपाक बनवण्यापासून ते स्विमिंग पूल साफ करण्यापर्यंतची सर्व कामे हा तिचा बॉयफ्रेंड करतो.
@julie.withthebooty खाते चालवणारी ज्युली ही एक लोकप्रिय TikTok स्टार आहे. तिच्या चाहत्यांकडून तिला अनेक प्रश्न विचारले जातात, विशेषतः तिच्या प्रेम संबंधाबाबत जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत. नुकतेच ज्युलीने अशाच काही चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी तिने सांगितले की, ती 44 वर्षांची आहे व तिचा प्रियकर 29 वर्षांचा आहे. एक 'शुगर ममा' असल्याचा आपल्याला अभिमान आहे. ती पुढे म्हणाली की, ती आपल्या बॉयफ्रेंडसाठी खूप काही करते, त्याला जी हवी ती गोष्ट मिळवून देण्याचा प्रयत्न करते. इतकेच नाही तर ती त्याला दर महिन्याला 15 लाख पगारही देते. (हेही वाचा: Sex in Car: 31 वर्षीय शिक्षिकेने 14 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत कारमध्ये अनेकवेळा केला सेक्स; बाल लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल)
या बदल्यात तिचा बॉयफ्रेंड जे काही ज्युलीला हवे आहे ते देण्याचा प्रयत्न करतो. घरातली सगळी कामेही तोच करतो. अनेकवेळा लोक या बॉयफ्रेंडला ज्युलीचा मुलगा समजतात, मात्र लोकांच्या अशा विचारांकडे ज्युली अजिबात लक्ष देत नाही. ती अभिमानाने सांगते की, आपल्याला लहान मुले आवडतात.