Blow Job During Rape: बलात्कार करताना मुखमैथुनासाठी आग्रह; महिलेने शिकवला आयुष्यभराचा धडा, घेतला लिंगाचा कडाडून चावा

अनेक देशांमध्ये बलात्कार करणाऱ्या व्यक्तीसाठी कडक शिक्षेची तरतूद आहे, मात्र अजूनही या प्रवृत्तीवर आळा बसला नाही. महिलांना अबला समजून त्यांच्यावर जबरदस्ती करणाऱ्या लोकांना अनेकदा चांगली अद्दल घडली आहे

Representational Image. (Photo Credit: File Photo)

जगाच्या पाठीवर कुठेही जा बलात्काराची (Rape) प्रवृत्ती सर्वत्रच आढळते. अनेक देशांमध्ये बलात्कार करणाऱ्या व्यक्तीसाठी कडक शिक्षेची तरतूद आहे, मात्र अजूनही या प्रवृत्तीवर आळा बसला नाही. महिलांना अबला समजून त्यांच्यावर जबरदस्ती करणाऱ्या लोकांना अनेकदा चांगली अद्दल घडली आहे व आता अशीच एक घटना घाना (Ghana) इथून समोर आली आहे. इथल्या 24 वर्षीय महिलेने बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या प्रायव्हेट पार्टचा कडाडून चावा घेतला आहे. हा आरोपी महिलेला मुखमैथुन (Blow Job) करण्यासाठी जबरदस्ती करत होता.

ओबुआसी (Obuasi), अशांती प्रांतात (Ashanti Region) ही घटना घडली आहे. येथे चोरी करण्यासाठी मध्यरात्री चोर एका घरात शिरला. घरात फक्त एकटी महिला असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यावेळी घरातील सामान चोरी करण्यादरम्यान त्याने या महिलेसोबत अश्लील कृत्य करण्याची मागणी केली. घरातील पैसे, टीव्ही सेट, फोन यांची चोरी केल्यानंतर त्याने मुखमैथुनासाठी जबरदस्ती केली. महिलेनेही या चोराच्या तावडीतून सुटका करण्यासाठी तो जसे म्हणेल तसे करण्यास सुरुवात केली.

ब्लो जॉबची प्रक्रिया चालू असताना या महिलेने आरोपीच्या लिंगाचा कडाडून चावा घेतला. हा चावा इतका जोरदार होता की त्याचे लिंग चक्क तुटले. Emmanuel Ankor वय 23 असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीला अँग्लोगोल्ड अशांती हॉस्पिटलमध्ये अटक करण्यात आली, जिथे तो उपचारासाठी दाखल झाला होता. पोलिस उपअधीक्षक (DSP) Francis Asenso यांनी घाना वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, पीडितेने पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर ती देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी तिथे तिने आरोपीला पहिले व पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. (हेही वाचा: औरंगाबाद येथे 20 वर्षीय मुलाकडून आईवर वारंवार बलात्कार; तीन महिने चालला होता लैंगिक अत्याचार)

ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे जाऊन पोलिसांनी आरोपीचे तुटलेले जननेंद्रिय मिळवले आणि ते रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.