Cryptocurrency: कंपनीच्या CEO चे निधन, पासवर्ड माहित नसल्याने गुंतवणूकदारांचे १३०० कोटी Bitcoin अडकले

निधन झालेल्या 30 वर्षीय सीईओचे नाव गेराल्ड कोटेन (Gerald Cotten) असे असल्याचे समजते. त्याचा मृत्यू गेल्या डिसेंबरमध्ये अल्पशा आजाराने झाल्याचे समजते. मृत्यू झाला त्या काळात तो भारताच्या दौऱ्यवर होता. इथे तो अनाथ मुलांसाठी एक आश्रम काढण्याच्या विचारात होता.

Cryptocurrency Company Quadriga CEO Gerald Cotten death | (Photo Credit: File Photo)

Bitcoin's death problem: कॅनेडीयन क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) कंपनीच्या एका 30 वर्षीय सीईओचा भारतात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकादारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही खळबळ सीईओच्या (CEO) मृत्यूमुळे नव्हे तर, पासवर्डमुळे उडाली आहे. या सीईओसोबतच करन्सीचा पासवर्डही गेला असल्याचे समजते. धक्कादायक असे की, क्रिप्टोकरन्सीचा सर्वा व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून चालतो. तसेच, त्यात होणारी गुंतवणूक ही बिटकॉइनमध्ये (Bitcoin) होते. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या व्यवहार आणि खात्यांची माहिती असलेल्या अकाऊंट केवळ कंपनीच्या सीईओकडेच होता. त्याच्याशिवाय तो इतर कोणालाही माहिती नव्हता. विशेष म्हणजे, या सीईओच्या पत्नीलाही हा पासवर्ड माहिती नाही. तसेच, टॉप सिक्योरिटी एक्सपर्टही हा पासवर्ड अनलॉक करण्यात असमर्थ ठरले आहेत. या सीइओच्या मृत्यूसोबत 190 मिलियन डॉलरची (तब्बल 13000 कोटी) गुंतवणूक अडकून राहिली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार चांगलेच हवालदील झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, निधन झालेल्या 30 वर्षीय सीईओचे नाव गेराल्ड कोटेन (Gerald Cotten) असे असल्याचे समजते. त्याचा मृत्यू गेल्या डिसेंबरमध्ये अल्पशा आजाराने झाल्याचे समजते. मृत्यू झाला त्या काळात तो भारताच्या दौऱ्यवर होता. इथे तो अनाथ मुलांसाठी एक आश्रम काढण्याच्या विचारात होता. कंपनीने आपल्या सोशल मीडिया पेजवर याबाबत माहिती दिली आहे. गेराल्ड कोटेन हा क्लवाड्रिगासीएक्स (Quadriga) नावाच्या कंपनीचा सीईओ होता. गेराल्ड याची पत्नी जेनिफर रोबर्टसन आणि कंपनीने न्यायालयात क्रेडिट अपील दाखल केल्यानंतर गराल्ड याचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती बाहेर आली.

क्रेडीट अपीलमध्ये म्हटले आहे की, कंपनी व्यवस्थापन गेराल्डचे एनक्रिप्टीड अकाऊंट अनलॉक करु शकले नाही. यात सुमारे 190 मिलियन डॉलरची क्रिप्टोकरन्सीही लॉक झाली आहे. सांगितले जात आहे की, ते ज्या लॅपटॉपने काम करत असत तो इन्क्रिप्टिड आहे. ज्याचा पासवर्ड त्यांच्या पत्नीलाही माहिती नाही. 31 जानेवारीला बेबसाईटच्या माध्यमातून क्वाड्रिगासीएक्स कंपनीने नोवा स्कोटिया सुप्रीम कोर्टात अपील केली होती. यात त्यांनी न्यायालयाला विनंती केली होती की, त्यांना आर्थिक अडचण दूर करण्यासाठी मान्यता दिली जावी.

कंपनीने पुढे म्हटले आहे की, 'गेल्या काही महिन्यांमध्ये आम्ही आमची समस्या सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आम्ही क्रिप्टोकरन्सी खात्यांचा शोध घेणे आणि त्यांना सुरक्षित करण्याचाही प्रयत्न केला. आम्ही ग्राहकांना त्यांच्या डिपॉझिटच्या हिशोबने पेसै देणे आहे परंतू आम्ही तसे करु शकत नाही कारण आम्ही त्यांच्या अकाऊंटपर्यंतच पोहोचू शकत नाही.' (हेही वाचा, देशातील पहिल्या बिटकॉइन 'एटीएम'ला टाळा; संचालकाची पाठवणी तुरुंगात)

दरम्यान, या प्रकारानंतर सोशल मीडियावर विविध मुद्दे उपस्थित करत चर्चा सुरु झाली आहे. काही लोकांनी हा एक घोटाळा असल्याचे म्हटले आहे. तर, काहींनी गेराल्डला काही आजार होता तर तो भारतात का आला होता, असा सवाल उपस्थित केला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now