Benjamin Netanyahu Could Lose Job as PM: इस्त्राईलमध्ये सत्तापालटाची चिन्हे; विरोधक आक्रमक, बेंजामिन नेतन्याहू यांच्या खुर्चीला धोका

'लंबी रेस का घोडा' घटलेले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांची सत्ता धोक्यात आली आहे. नेतन्याहू यांच्या विरोधात विरोधकांची आघाडी चांगलीच भक्कम होताना दिसत आहे. ही आघाडी आता इतकी भक्कम झाली आहे की, गेली 12 वर्ष इस्त्राईलचे पंतप्रधान राहिलेलेले बेंजामिन नेतन्याहू यांना पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो.

Benjamin Netanyahu | (Photo Credits: Facebook)

इस्त्राइलच्या राजकारणात नवे वळण आले आहे. 'लंबी रेस का घोडा' घटलेले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांची सत्ता धोक्यात आली आहे. नेतन्याहू यांच्या विरोधात विरोधकांची आघाडी चांगलीच भक्कम होताना दिसत आहे. ही आघाडी आता इतकी भक्कम झाली आहे की, गेली 12 वर्ष इस्त्राईलचे पंतप्रधान राहिलेलेले बेंजामिन नेतन्याहू यांना पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. इस्त्राईलमध्ये (Israel) सध्या राष्ट्रवादी कट्टरपंथी नेते व यामीना पक्षाचे नफ्ताली बेनेट यांनी घोषणा केली आहे की, ते एक नवी आघाडी स्थापन करत आहेत. ही आघाडी बेंजामीन नेतन्याहू यांच्या सत्तेला आव्हान देऊ शकते.

इस्त्राईलचे दक्षिणपंथी नेते नेतन्याहू यांचे विरोधक संसदेत आघाडी करत आहेत. त्यांचा कार्यकाळा बुधवारी (2 मे) समाप्त होत आहे. अशा काळात नवी आघाडी आणि खासदारांच्यात होत असलेल्या बैठका चर्चांना वेग आला आहे. इस्त्राईलच्या राजकारणाचा प्रदीर्घ काळ अनुभव असलेले 71 वर्षांचे नेते नेत्यानाहू यांच्यावर भ्रष्टाचार, विश्वासघात आणि घुसखोरी असे अनेक आरोप विरोधकांनी केले आहेत. या आरोपांवरुन इस्त्राईलच्या राजकारणात मोठी हालचाल सुरु झाली आहे. दरम्यान, नेत्यानाहूंनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. (हेही वाचा, China मध्ये आता तीन मुलांना जन्म देण्यास नागरिकांना परवानगी, 'या' कारणामुळे जिनपिंग सरकारने बदलले नियम)

नेत्यानाहू यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर पाठिमागील दोन वर्षांमध्ये इस्त्राईलमध्ये चार निवडणुका पार पडल्या. या निवडणुका अनिर्णयीत राहिल्या. दरम्यान, गाझा पट्टीवर इस्लामिक कट्टरपंथी समूह असलेल्या हमाससोबत लष्करी संघर्षानंतर इस्त्राईलमध्ये विरोधकांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. यंदाच्या मार्च महिन्यात झालेल्या निवडणुकांमध्ये नेतन्याहू यांची 'लिकूड पार्टी' सर्वाधिक जागा मिळवून सत्तेवर आली. परंतू ते सरकार स्थापन करण्यास असमर्थ ठरले होते.

दरम्यान, विरोधी पक्षनेते आणि माजी टीव्ही अँकर लॅपीड यांच्याजवळ विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी बुधवारी सायंकाळपर्यंत वेळ आहे. 57 वर्षांचे यैर लॅपिड हे घटनेनुसार आघाडीची मागणी करत आहेत. ज्याला इस्त्रायली मीडियाने 'परिवर्तन' सोबतच एक गट म्हणून संबोधले आहे. लॅपीड यांच्या पक्षाला मागच्या निवडणुकीत 17 जागा मिळाल्याचे सांगतात. त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मिळाली होती.