Bed Bath & Beyond: कर्मचाऱ्यांना कामावरु काढल्याचा मनस्ताप; कंपनी CFO Gustavo Arnal ची आत्महत्या

गुस्तावो अर्नेल (Gustavo Arnal) असे या सीएफओचे नाव आहे. ते बाथ अँड बियॉन्ड (Bed Bath & Beyond) कंपनीसाठी काम करत होते.

Gustavo Arnal | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अमेरिकेतील एका कंपनीच्या चीफ फायनान्शिअल ऑफिसर (CFO) ने एका गगनचुंबी इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. गुस्तावो अर्नेल (Gustavo Arnal) असे या सीएफओचे नाव आहे. ते बाथ अँड बियॉन्ड (Bed Bath & Beyond) कंपनीसाठी काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुस्तावो अर्नेल (Gustavo Arnal) 18 मजल्यांच्या उंच इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. बाथ अँड बियॉन्ड या रिटेल कंपनीने पाठिमागील काही दिवसांमध्ये काही स्टोर बंद करण्याचा आणि कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीने ही घोषणा केल्यानंतर आलेला दबाव गुस्तावो अर्नेल यांना झेलता आला नाही. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या हवाल्याने आंतरारष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अर्नेल यांनी 2020 मध्ये बाथ अँड बियॉन्ड कंपनीत नोकरी सुरु केली होती. त्या आधी ते कॉस्मेटिक ब्रांड एवोन (Avon) मध्ये CFO होते. या कामाचा त्यांना 20 वर्षांचा अनुभव होता.

न्यूयॉर्क पोलिसांच्या हवाल्याने सीएनएनने म्हटले आहे की, 52 वर्षीय अर्नेल यांनी शुक्रवारी 12.30 वाजता उंच इमारती जवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. दिलेल्या आवाजांना ते कोणताही प्रतिसाद देत नव्हते. इमारतीच्या 18 व्या मजल्यावरुन उडी मारल्याने त्यांना गंभीर स्वरुपात दुखापत झाली होती. आपत्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्यांना वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. (हेही वाचा, Vladimir Putin यांचा उजवा हात Aleksandr Dugin यांची कन्या Daria Dugina कार अपघातात मृत्यू, मॉस्को येथील घटना)

प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे की, अर्नेलव यांची पत्नीने त्यांना इमारतीवरुन उडी मारताना पाहिले. त्यांच्या या कृतीबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारचा घातपात असल्याचे म्हटले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, अन्रेलव यांच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिक माहिती नाही. नूयॉर्क सीटीचे वैद्यकीय तपास अधिकारी त्यांच्या मृत्यूचे कारण सांगू शकतील. दरम्यान बेड बाथ अँड बियॉन्ड ने रविवारी त्यांच्या मृत्यूबाबत पुष्टी केली. मात्र, अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिली नाही.