Earthquake In Mexico: मैक्सिकोच्या दक्षिणेकडील राज्य ओक्साका शहर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; 7.4 तीव्रतेची नोंद
मैक्सिकोच्या दक्षिणेकडील राज्य ओक्सासा (Oaxaca) शहर भूकंपाच्या (Earthquake) धक्क्यांनी हादरले आहे.
संपूर्ण जग कोरोना संकटाशी झुंज देत असताना मैक्सिको (Mexico) येथून खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. मैक्सिकोच्या दक्षिणेकडील राज्य ओक्सासा (Oaxaca) शहर भूकंपाच्या (Earthquake) धक्क्यांनी हादरले आहे. हा भूकंपाचे झटके इतके जोरदार होते की, ओक्सासा येथील इमारतींनादेखील मोठा हादरा बसला आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. मैक्सिकोत याआधी 2 वेळा भूकंप आला होता. ज्यामुळे शेकडो लोकांनी आपला जीव गमवला होता.
मैक्सिकोत याआधी 8 डिसेंबर 2017 दोनदा भूकंप आला होता. या भूकंपाची तीव्रता 8.1 इतकी नोंदवली गेली होती. ज्यात 150 अधिक जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 20 सप्टेंबरमध्येही भूकंप आला होता. त्यावेळी मोठी जीवितहानी झाली असून 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट निर्माण झाले होते. यामुळे मैक्सिकोमधील लोकांच्या मनात अधिक भिती निर्माण झाली आहे. हे देखील वाचा- Earthquake In Mizoram: मिजोरम राज्याला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के, भूकंप मापन यंत्रावर 5.5 तीव्रतेची नोंद
एएनआयचे ट्विट-
मिझोरम राज्याला सोमवारी पहाटे भूकंपाचा धक्का बसला. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नसून मोठय़ा प्रमाणात वित्तहानी झाली असल्याची माहिती राज्यातील भूशास्त्र आणि खनिज संसाधान विभागाने दिली आहे. या भूकंपाची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. हा भूकंप सोमवारी पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी झाला, अशी माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे.