अबब! अमेरिकेत एक केळ विकले 85 लाखाला; फोटो होतोय व्हायरल
सध्या बाजारात एक डझन केळींची किंमत 40 ते 50 रुपयांच्या दरम्यान आहे. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? सध्या सोशल मीडियावर एका 85 लाखांच्या केळाचा फोटो व्हायरल होत आहे. हे केळं भिंतीवर टेपने चिटकवण्यात आले आहे.
आपण बारातून नेहनी केळी खरेदी करत असतो. सध्या बाजारात एक डझन केळींची किंमत 40 ते 50 रुपयांच्या दरम्यान आहे. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? सध्या सोशल मीडियावर एका 85 लाखांच्या केळाचा फोटो व्हायरल होत आहे. हे केळं भिंतीवर टेपने चिटकवण्यात आले आहे. आता तुम्ही म्हणालं की, या केळामध्ये असं काय वेगळं आहे. परंतु, हे खरे केळं नसून ही एक कलाकृती आहे. 'मियामी' या समुद्राजवळ असलेल्या 'बेसेलने' या संग्रहालयाने ही कलाकृती 85.81 लाख रुपयांना विकली आहे. ही कलाकृती प्रसिद्ध इटालियन कलाकार मॉरीझिओ कॅटलन यांनी बनवलेली आहे. मॉरीझिओने यापूर्वीही 3 कलाकृती तयार केल्या आहेत. त्यापैकी 2 कलाकृती विकल्या गेल्या आहेत. (हेही वाचा - विकृतीचा कळस! भूक लागली म्हणून 21 वर्षीय तरुणाने महिलेच्या डोक्याची कवटी फोडून खाल्ला मेंदू)
केळं हे जागतिक व्यापार आणि विनोदबुद्धीचे प्रतीक आहे. म्हणून पॅरिसियन आर्ट गॅलरीचे मालक इमॅन्युले पॅरोटीने या कलाकृतीला 'कॉमेडियन' असे नाव दिले आहे. दरम्यान, पॅरोटीनने यांनी सांगितले की, 'या केळाच्या तुकड्यांची किंमत ही त्या वस्तुला दिलेले महत्त्व ठरवते. कॅटेलन आपल्या हॉटेलच्या खोलीत एक शिल्प बनवण्याचा विचार करीत होता. ही कलाकृती त्याला नेहमी प्रेरणा देईल, यासाठी त्याने हे शिल्प आपल्या खोलीत लावले. ही कलाकृती करण्यासाठी कॅटेलनने तांब्याची केळी तयार केली. त्यानंतर त्याने त्याला खऱ्या केळीसारखा रंग दिला आणि ती केळी टेप भिंतीला चिटकवली.'
शनिवारी एका व्यक्तीने ही केळी खाल्ली आहे. डेव्हिड डातुना यांनी या ही केळी खातानाचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
ब्रिटनमधील ऑक्सफोर्डशायर येथील ब्लेनहिम पॅलेसमधील सोन्याने बनवलेल्या शौचालयाची चोरी झाली होती. हे टॉयलेट 18 कॅरेट सोन्याचे बनलेले होते. येथे उभारलेल्या कला प्रदर्शनातून चोरांच्या टोळीने ते चोरले होते. हे शौचालय मॉरीझिओ कॅटलन यांनी बनवले होते.