Air India Express to Dubai Airports Suspended: दुबई मध्ये एयर इंडिया एक्सप्रेस च्या विमानांना 2 ऑक्टोबर पर्यंत नो एन्ट्री; कोरोनाबाधित प्रवासी आढळल्याने निर्णय
दुबई के एविएशन डिपार्टमेंटने ( Dubai Civil Aviation Authority) नियमांचं उल्लंघन झाल्याने या प्रकरणांची गंभीर दखल घेत आता विमानं रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतासह जगभरामध्ये सध्या कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे. मागील सहा महिन्यांपासून कोरोनाचा सामाना करत पुन्हा जनजीवन सुरळीत करण्यासाठी जगभरातील नेते काम करत आहेत. अशामध्ये आता एअर इंडिया एक्सप्रेस च्या दुबईला जाणार्या विमानांप्रकरणी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. दरम्यान आता एअर इंडिया एक्सप्रेसच्या (Air India Express) फ्लाईट्स 2 ऑक्टोबर पर्यंत दुबईमध्ये ( Dubai Airports) प्रवेश करू शकणार नाहीत असं सांगण्यात आलं आहे. पुढील 15 दिवसांसाठी ही प्रवेश बंदी असेल. दरम्यान मागील काही दिवसांत 2 वेळेस कोरोना बाधित लोकं विमानाने प्रवास करत असल्याची बाब उघड झाली आहे.
4 सप्टेंबरला जयपूर ते दुबई प्रवास करणार्या एअर इंडिया एक्सप्रेस विमानामध्ये एका फ्लाईट मध्ये प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसातला हा दुसरा प्रकार आहे. त्यामुळे आता दुबई एअरपोर्टवर एअर इंडियाच्या विमानांना रोखण्याचा निर्णय झाला आहे. UAE मध्ये प्रवेशासाठी 12 वर्षावरील भारतीय प्रवाशांना COVID 19 Negative रिपोर्ट सादर करणं आवश्यक: Air India Express.
ANI Tweet
दुबई के एविएशन डिपार्टमेंटने ( Dubai Civil Aviation Authority) नियमांचं उल्लंघन झाल्याने या प्रकरणांची गंभीर दखल घेत आता विमानं रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारतीयांना 2 ऑक्टोबर पर्यंत एयर इंडिया एक्सप्रेसच्या माध्यमातून दुबईत प्रवेश करण्यावर बंधनं आली आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी एअर इंडिया एक्सप्रेसने 12 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकच्या वयातील प्रवाशांना युएईमध्ये येण्यासाठी कोरोना PCR Test करावी लागणार आहे. ही 96 तासांपेक्षा अधिक जुनी नसावी. दरम्यान जर या टेस्टचा निकाल निगेटीव्ह असेल तर त्याचासरकारी लॅबचा प्रिंटेंट रिपोर्ट सादर करणं बंधनकारक असेल. अशी माहिती देत प्रवास सेवा सुरू केली होती.