Air India Flight Receives Bomb Threat: ब्रिटनहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी; रियाधमध्ये करण्यात आले आपत्कालीन लँडिंग

या विमानाचे सौदी अरेबियातील रियाध येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यानंतर, A114 विमानाची संपूर्ण सुरक्षा तपासणी करण्यात आली. परंतु त्यात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

Air India Flight Receives Bomb Threat: ब्रिटनहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी; रियाधमध्ये करण्यात आले आपत्कालीन लँडिंग
Air India Flight Representative Image | X @ Air India

Air India Flight Receives Bomb Threat: ब्रिटनहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) विमानाला बॉम्बची धमकी (Bomb Threat) मिळाली. त्यानंतर या विमानाचे सौदी अरेबियातील रियाध येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यानंतर, A114 विमानाची संपूर्ण सुरक्षा तपासणी करण्यात आली. परंतु त्यात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. प्रवाशांना दिल्लीला आणण्यासाठी दुसरे विमान व्यवस्था करण्यात येत असल्याचे एअरलाइनने सांगितले. दुसऱ्या विमानाची व्यवस्था होईपर्यंत एअरलाइनने प्रवाशांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, 21 जून रोजी बर्मिंगहॅमहून निघालेले विमान AI114, धमकी मिळाल्यानंतर सौदीच्या राजधानीत सुरक्षितपणे उतरवण्यात आले. मानक सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करून, विमानाची लँडिंग करताना कसून तपासणी करण्यात आली. परंतु, या विमानात कोणताही धोका आढळला नाही. (हेही वाचा -IndiGo Flight Emergency Landing: इंधनाच्या कमतरतेमुळे 'मेडे कॉल'नंतर इंडिगोच्या विमानाचे बेंगळुरूमध्ये आपत्कालीन लँडिंग)

रियाधमध्ये करण्यात आले सुरक्षित लँडिंग -

प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था -

दरम्यान, टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडियाने सांगितले की, प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. एअरलाइनच्या प्रवक्त्याने झालेल्या गैरसोयीबद्दल तीव्र खेद व्यक्त केला आहे. 12 जून रोजी अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाने आपल्या विमानांची तपासणी वाढवली आहे. (हेही वाचा - Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातानंतर DGCA दिले एअर इंडियाच्या 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश)

एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बस्फोटाची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही एअर इंडियाच्या विमानांना अशा धमक्या अनेक वेळा मिळाल्या आहेत. अलिकडेचं एअर इंडियाला बॉम्बस्फोटाच्या धमकीशी संबंधित एक प्रकरण जयपूरमध्येही नोंदवण्यात आले होते. येथे अज्ञात लोकांनी व्हॉट्सअॅपद्वारे जयपूर विमानतळावर एअर इंडियाचे विमान उडवून देण्याची धमकी दिली होती.

(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2025 08:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).