Imran Khan, Bilawal Bhutto's X Accounts Blocked in India: पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यानंतर इम्रान खान आणि बिलावल भुट्टो यांचे एक्स अकाउंट भारतात ब्लॉक
. याआधीही भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या एक्स अकाउंटवर भारतात बंदी घातली होती. ख्वाजा आसिफ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सतत भारताविरुद्ध विष ओकत होते. त्यांनी भारतावर अणुहल्ला करण्याची धमकीही दिली.
Imran Khan, Bilawal Bhutto's X Accounts Blocked in India: भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दोन मोठ्या नेत्यांविरुद्ध डिजिटल कारवाई केली आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) आणि माजी पाकिस्तान पंतप्रधान आणि पीटीआय संस्थापक इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांचे एक्स अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात (X Accounts Blocked in India) आले आहेत. याआधीही भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या एक्स अकाउंटवर भारतात बंदी घातली होती. ख्वाजा आसिफ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सतत भारताविरुद्ध विष ओकत होते. त्यांनी भारतावर अणुहल्ला करण्याची धमकीही दिली.
बिलावल भुट्टो यांचा भारताला इशारा -
बिलावल भुट्टो यांनी भारताविरुद्ध अनेक विधानेही केली होती. जर भारताने पाणी थांबवले तर नद्यांमध्ये रक्तपात होईल, असा इशारा त्यांनी यापूर्वी दिला होता. एका सभेला संबोधित करताना भुट्टो म्हणाले होते, सिंधू आमची आहे आणि आमचीच राहील, एकतर आमचे पाणी त्यात वाहेल किंवा त्यांचे रक्त. मोहेंजोदारो संस्कृती लारकानामध्ये आहे. आम्ही तिचे खरे संरक्षक आहोत आणि आम्ही तिचे रक्षण करू. पंतप्रधान मोदी सिंध आणि सिंधूच्या लोकांमधील शतकानुशतके जुने नाते तोडू शकत नाहीत, असं बिलावल भुट्टो यांनी म्हटलं होतं. (हेही वाचा - Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरुचं! नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर)
पाकिस्तानच्या अनेक यूट्यूब चॅनेल्सवर बंदी -
यापूर्वीही भारताने क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या डॉन न्यूज, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, द पाकिस्तान रेफरन्स, जिओ न्यूज, समा स्पोर्ट्स, इर्शाद भट्टी, जीएनएन, उजैर क्रिकेट, अमर चीमा एक्सक्लुझिव्ह, अस्मा शिराजी, मुनीब फारूख, सुनो न्यूज एचडी आणि रझी नामा या पाकिस्तानच्या प्रमुख यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली होती. या यूट्यूब चॅनेल्सचे कोट्यावधी सबस्क्राइबर आहेत. (हेही वाचा - Pahalgam Terror Attack: 'अल्लाहू अकबर म्हणताच सुरू झाला गोळीबार'; झीपलाईन वर असलेल्या प्रत्यक्षदर्शी ऋषी भट्टचा खळबळजनक दावा, NIA ने झीपलाईन ऑपरेटरला बजावला समन्स (Watch Video))
याशिवाय, भारतात पाकिस्तान क्रिकेट लीग (PSL) च्या प्रसारणावरही बंदी घालण्यात आली आहे. त्याचे अधिकृत डिजिटल प्रसारण अधिकार FANCODE अॅपला देण्यात आले होते, ज्याने 24 एप्रिलपासून भारतात PSL चे प्रसारण थांबवले आहे. त्याच वेळी, सोनी स्पोर्ट्स नेटवर्कनेही भारतात या लीगचे प्रसारण थांबवले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)