Disney Plans Layoffs: Meta, Twitter नंतर 'डिस्ने'नेही उचललं मोठं पाऊल; कंपनी अनेक कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याची शक्यता
ज्यामुळे सध्या मंदीचं सावट आहे. डिस्नेचे मुख्य कार्यकारी बॉब चापेक यांनी कंपनीच्या शीर्ष नेतृत्वाला एक मेमो पाठवला. यात त्यांनी म्हटलं आहे की, ते टारगेटेड हायरिंग गोठवत आहे.
Disney Plans Layoffs: ट्विटर (Twitter), मेटा (Meta) या सोशल मीडिया वेबसाइटसह अनेक कंपन्यांमध्ये टाळेबंदी (Layoffs) केल्यानंतर आता वॉल्ट डिस्नेनेही (Disney) कठोर पावले उचलली आहेत. कंपनी नवीन नियुक्ती गोठवण्याचा आणि अनेक कर्मचार्यांना काढून टाकण्याचा विचार करत आहे. यामागचं कारण म्हणजे डिस्ने प्लसची स्ट्रीमिंग सेवा प्रॉफिटमध्ये नसणे हे आहे. पाश्चात्य देशांमध्ये आर्थिक अनिश्चिततेचा काळ सुरू आहे. ज्यामुळे सध्या मंदीचं सावट आहे. डिस्नेचे मुख्य कार्यकारी बॉब चापेक यांनी कंपनीच्या शीर्ष नेतृत्वाला एक मेमो पाठवला. यात त्यांनी म्हटलं आहे की, ते टारगेटेड हायरिंग गोठवत आहे. तसेच, काही कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे, जेणेकरून खर्चाचे व्यवस्थापन करता येईल.
चापेक यांनी मेमोमध्ये लिहिले आहे, "काही आर्थिक घटक आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत. उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी नियंत्रित करू शकत असलेल्या गोष्टी व्यवस्थापित करण्यासाठी आपले कार्य चालू ठेवले पाहिजे." चापेक म्हणाले की, डिस्नेने मुख्य वित्तीय अधिकारी क्रिस्टीन मॅककार्थी आणि जनरल काउंसिल होरासिओ गुटेरेझ यांच्यासह एक टास्क फोर्स स्थापन केली आहे. ज्याचा उपयोग महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी होणार आहे. (हेही वाचा - Amazon Layoffs: Meta, Twitter आणि Microsoft नंतर आता अॅमेझॉननेही केली कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात)
कंपनीने आधीच कंटेंट आणि मार्केटिंग खर्च पाहण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कपातीमुळे गुणवत्तेचा त्याग केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. एंटरटेनमेंट जायंटला त्याच्या स्ट्रीमिंग व्हिडिओंमुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे. डिस्नेने वॉल स्ट्रीटच्या तिमाही कमाईच्या अंदाजांना मागे टाकल्यानंतर कंपनीने काही महत्त्वाची पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
निकालानंतर कंपनीचे शेअर्स बुधवारी 13% पेक्षा जास्त घसरले. डिस्नेने म्हटले आहे की, वेगाने वाढणाऱ्या सेवेने चौथ्या तिमाहीत 12 दशलक्ष ग्राहक जोडले. कंपनीने म्हटले आहे की, डिस्ने+ आर्थिक वर्ष 2024 मध्ये फायदेशीर ठरेल. डिस्ने प्लस त्याच्या व्हिडिओ सामग्रीसाठी ओळखले जाते. या स्ट्रीमिंग कंपनीने Star Wars, The Mandalorian, Hawk Eye इत्यादी ऑरिजनल सिरिज तयार केल्या आहेत. दरम्यान, वॉल स्ट्रीट विश्लेषकांनी डिस्नेच्या वाढत्या स्ट्रीमिंग खर्चाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
अलीकडेच, फेसबुकची मूळ कंपनी मेटाने 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला. मेटाने सांगितले की, कंपनी वाढत्या खर्च आणि कमकुवत जाहिरात बाजाराशी लढा देत असल्याने या वर्षीच्या सर्वात मोठ्या टाळेबंदीमध्ये 13 टक्के किंवा 11,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येईल. 18 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मेटा एवढ्या मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी करत आहे. अलीकडे, इलॉन मस्कच्या मालकीच्या ट्विटर आणि मायक्रोसॉफ्टसह अनेक दिग्गज कंपन्यांमध्ये हजारो कर्मचाऱ्यांनाही काढून टाकण्यात आले आहे.