इंडोनेशिया: जकार्ताहून उड्डाण केलेले Sriwijaya चे विमान SJ182 रडारवरून एकाएकी झाले गायब
मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तसेच या विमानाचा अजून शोध देखील लागलेला आहे.
इंडोनेशियाहून (Indonesia) उड्डाण केलेल्या विमानाबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इंडोनेशियाच्या जकार्ताहून (Jakarta) उड्डाण केलेल्या Sriwijaya चे विमान SJ182 रडारवरून एकाएकी गायब झाले आहेत. या विमानाचा उड्डाणानंतर अचानक संपर्क तुटल्याने काहीतरी भयानक गोष्ट घडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्व विमान यंत्रणा याबाबत शोध घेत आहेत. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तसेच या विमानाचा अजून शोध देखील लागलेला आहे. मात्र उड्डाण केलेले विमान अचानक रडारवरून गायब होणे म्हणजेच काहीतरी भयंकर घडले असल्याचे शंका व्यक्त केली जात आहे.
विमान बेपत्ता झाल्यानंतर आणि त्याचा संपर्क तुटल्यानंतर इंडोनेशियामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अजूनपर्यंत तरी या विमानाबाबत कुठलीही माहिती मिळालेली नाही. अजूनही विमानातील वैमानिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र याबाबत अद्याप कुठलीही माहिती हाती लागलेली नाही.हेदेखील वाचा- UK-India Flights Suspension: 31 डिसेंबर पर्यंत युके मधून भारतामध्ये येणारी सारी विमानं New Mutant of Coronavirus भीतीच्या पार्श्वभूमीवर रद्द
आतापर्यंत विमान अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान उड्डाण घेतल्यानंतर 4 मिनिटांत ते 10,000 फूटांपेक्षा अधिक उंचावर पोहोचले आणि त्यानंतर या विमानाशी एकाएकी संपर्क तुटला. त्यानंतर सर्व विमानतळावरील यंत्रणा या विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अजूनपर्यंत तरी या विमानाशी काहीही संपर्क होऊ शकलेला नाही.