लज्जास्पद! 37 वर्षीय नराधमाने केला कोंबडीसोबत Sex; पत्नीनेचं रेकॉर्ड केला व्हिडिओ, न्यायालयाने आरोपीला सुनावली 3 वर्षाची शिक्षा
एका 37 वर्षीय नराधमाने चक्क कोंबडीसोबत (Chicken) लैंगिक संबंध ठेवल्याचं उघडकीस आलं आहे.
ब्रिटनमध्ये (Britain) अत्यंत लज्जास्पद घटना घडली आहे. एका 37 वर्षीय नराधमाने चक्क कोंबडीसोबत (Chicken) लैंगिक संबंध ठेवल्याचं उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे नराधमाच्या पत्नीनेचं या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. दोषीला न्यायालयाने 3 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. डेली मेलने प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दोषी ठरलेल्या 37 वर्षीय आरोपीचे नाव रेहान बेग आहे. हे प्रकरण ब्रिटनच्या ब्रॅडफोर्डमध्ये घडलं आहे. ब्रॅडफोर्ड क्राउन कोर्टाने बेग यांना शिक्षा सुनावली.
अहवालानुसार, लैंगिक संबंधामुळे कोंबडीचा मृत्यू झाला आहे. याशिवाय आरोपी बेगच्या पत्नीने कबूल केले की, तिनेही आपल्या पतीला अनेक विचित्र कृती करण्यात पाठिंबा दर्शविला. मात्र, घरगुती हिंसाचाराच्या पुराव्यांमुळे बेगच्या पत्नीला न्यायालयाने शिक्षा ठोठावली नाही. (हेही वाचा -Gangrape: तुरुंगात असलेल्या आमदार विजय मिश्रा यांचा मुलगा विष्णू मिश्रा याच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल)
ब्रॅडफोर्ड क्राउन कोर्टाने बेगचे हे कृत्य अत्यंत विकृत आणि लज्जास्पद कृत्य म्हटलं आहे. मुलांच्या लैंगिक शोषणाच्या छायाचित्रांची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय गुन्हे संस्थेने बेगच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी बेगच्या या विकृत कृत्याचा खुलासा झाला. त्यावेळी राष्ट्रीय गुन्हे शाखेला बेगच्या कॉम्पूटरमध्ये मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची छायाचित्रेदेखील मिळाली. बेगच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये त्याने आतापर्यंत अनेक कोंबड्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याचे उघडकीस आले आहे.
बेगने आपल्या घराच्या तळघरामध्ये या कृत्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. बेगच्या या विचित्र कृत्यामध्ये त्याच्या पत्नीनेदेखील साथ दिली. याशिवाय बेगच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये कुत्राबरोबर लैंगिक कृत्य करणाऱ्या दोन जोडप्यांचे फोटो सापडले आहेत. मात्र, त्यांची ओळख पटली नाही. रेहम बेग याने स्वत: तसेच आपल्या आपल्या पत्नीला प्राण्यासोबत लैंगिक कृत्य करण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे बेगला न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.