Ebola Virus Outbreak: युगांडामध्ये इबोला विषाणूचा प्रादुर्भाव, 7 जणांना संसर्ग; एका रुग्णाचा मृत्यू

युगांडाच्या आरोग्य मंत्रालयातील कमांडर हेन्री क्योबे यांनी गुरुवारी सांगितले की, इबोलाचा प्रादुर्भाव झाल्याची पुष्टी होण्यापूर्वीच देशात 7 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Ebola Virus Outbreak प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Twitter)

Ebola Virus Outbreak: युगांडात इबोला विषाणू (Ebola Virus) ने पुन्हा एकदा दार ठोठावले आहे. युगांडा (Uganda) च्या आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे की, सात जणांमध्ये इबोला विषाणूची पुष्टी झाली असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. सिन्हुआ न्यूज एजन्सीने वृत्त दिले आहे की, युगांडापूर्वी सुदानमध्ये इबोला संसर्गाची काही प्रकरणे दिसली होती.

युगांडाच्या आरोग्य मंत्रालयातील कमांडर हेन्री क्योबे यांनी गुरुवारी सांगितले की, इबोलाचा प्रादुर्भाव झाल्याची पुष्टी होण्यापूर्वीच देशात 7 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. इबोलाचा संसर्ग पाहता खबरदारी म्हणून आरोग्य अधिकारी संपर्क ट्रेसिंग आणि COVID-19 उपचार केंद्रांची पुनर्रचना करण्याचे काम करत आहेत. (हेही वाचा - Lumpy Virus: 21 जिल्ह्यातील प्राण्यांमध्ये लम्पी व्हायरसचा संसर्ग, होणार दूध पुरवठ्यावर परिणाम?)

डब्ल्यूएचओने मंगळवारी सांगितले की, 24 वर्षीय पुरुषाचा नमुना तुलनेने दुर्मिळ सुदान स्ट्रेन म्हणून ओळखला गेला आहे. इबोला विरूद्धच्या सध्याच्या लस झैर स्ट्रेनच्या विरूद्ध प्रभावी आहेत, परंतु ते सुदान स्ट्रेनविरूद्ध प्रभावी होतील की नाही हे स्पष्ट नाही.

इबोला हा एक गंभीर, प्राणघातक रोग आहे. जो मानव आणि इतर प्राण्यांना प्रभावित करतो. आतापर्यंत, इबोलाचे 6 वेगवेगळे प्रकार आढळून आले आहेत. त्यापैकी बुंदीबुग्यो, सुदान आणि झैरे या तीन प्रकारांनी मोठा उद्रेक झाला आहे. मागील उद्रेकांमध्ये सुदान स्ट्रेनचा मृत्यू दर 41 टक्के ते 100 टक्के बदलला आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, सहायक उपचारांच्या सुरुवातीच्या रोल-आउटमुळे इबोला मृत्यूमध्ये लक्षणीय घट झाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif