Death of Indian Students Abroad: धक्कादायक! गेल्या 5 वर्षांत 633 भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशात मृत्यू; कॅनडा, अमेरिकेत मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक

याव्यतिरिक्त, हल्ल्यांमध्ये 19 भारतीय विद्यार्थी ठार झाले असून कॅनडामध्ये सर्वाधिक नऊ मृत्यू झाले. त्यानंतर अमेरिकेत सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Death of Indian Students Abroad प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Death of Indian Students Abroad: परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) जारी केलेल्या आकडेवारीवरून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत, नैसर्गिक कारणे, अपघात आणि वैद्यकीय परिस्थिती यासह विविध कारणांमुळे 633 भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशात मृत्यू  (Indian Students Died Abroad) झाला आहे. हे मृत्यू 41 देशांमध्ये झाले आहेत. कॅनडा (Canada) मध्ये सर्वाधिक 172 भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, त्यानंतर अमेरिकेत (America) 108 मृत्यू झाले आहेत. याव्यतिरिक्त, हल्ल्यांमध्ये 19 भारतीय विद्यार्थी ठार झाले असून कॅनडामध्ये सर्वाधिक नऊ मृत्यू झाले. त्यानंतर अमेरिकेत सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

शुक्रवारी लोकसभेच्या चालू पावसाळी अधिवेशनादरम्यान केरळचे खासदार कोडीकुन्नील सुरेश यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात 2019 पासून परदेशात मरण पावलेल्या विविध उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा तपशील उघड झाला. परराष्ट्र मंत्रालयातील राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, परदेशात भारतीय विद्यार्थ्यांचे हे मृत्यू नैसर्गिक कारणं, अपघात आणि वैद्यकीय परिस्थितीमुळे झाले आहेत. (हेही वाचा -Indian Student Dies In US: अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; 2024 मध्ये आतापर्यंत 11 हून अधिक विद्यार्थ्यांनी गमावला जीव)

कीर्ती वर्धन सिंग यांनी सांगितले की, कॅनडा आणि यूएस खालोखाल, यूके (58), ऑस्ट्रेलिया (57), रशिया (37) आणि जर्मनी (24) मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण असलेले देश आहेत. पाकिस्तानमधून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यावेळी सिंग यांनी परदेशात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित केली. परदेशात भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितता प्रदान करणे हे भारत सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक असल्याचंही सिंग यांनी यावेळी नमूद केलं. (हेही वाचा - Indian Student Death in Australia: ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या; हरियाणामध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांनी केली सरकारकडे मदतीची मागणी)

सिंग पुढे बोलताना सांगितलं की, हल्ल्यामुळे 19 भारतीय विद्यार्थी मरण पावले. ज्यामध्ये कॅनडात सर्वाधिक नऊ विद्यार्थी आहेत, त्यानंतर यूएसमध्ये सहा, ऑस्ट्रेलियामध्ये एक, चीनमध्ये एक, यूकेमध्ये एक आणि किर्गिस्तानमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. परदेशात भारतीय मिशन्स/पोस्ट्स उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबत MADAD पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करतात. जेणेकरून त्यांच्या तक्रारीचे आणि समस्यांचे वेळेत निराकरण केले जाऊ शकते.