IPL Auction 2025 Live

चीन: कोरोना व्हायरसची लागण झाल्याने 2000 जणांचा बळी

या विषाणूची लागण झाल्याने आतापर्यंत 2000 जणांचा बळी गेला आहे. तसेच मागील 24 तासांत 136 जणांचा मृत्यू झाला आहे. चीन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 74 हजार 185 कोरोना विषाणूंची प्रकरणे समोर आली आहेत.

Coronavirus Outbreak in China (Photo Credits: IANS)

चीनमध्ये थैमान घातलेला कोरोना व्हायरसचा (Corona Virus) विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. या विषाणूची लागण झाल्याने आतापर्यंत 2000 जणांचा बळी गेला आहे. तसेच मागील 24 तासांत 136 जणांचा मृत्यू झाला आहे. चीन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 74 हजार 185 कोरोना विषाणूंची प्रकरणे समोर आली आहेत.

राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे 2004 जणांचा मृत्यू झाला असून 1749 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. मागीत 24 तासांत 136 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 132 रुग्ण हे हुबेईमधील हेइलोंगजियांग, शानदोंग, गुआंगदोंग आणि गुईझोऊ प्रातांतील आहेत. (हेही वाचा - धक्कादायक! चीनमध्ये Coronavirus मुळे तब्बल 1,665 जणांचा मृत्यू; देशात एकूण 68,500 जणांना लागण)

सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या 11 हजार 977 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तसेच कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 14 हजार 376 लोकांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. मंगळवारी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. ली झिमिंग, असे या मृत डॉक्टरांचे नाव होते. चीनमधील आरोग्य विभागात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे रुग्णाबरोबरचं डॉक्टरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.