तुर्कस्तानमध्ये 6.8 रिश्टर स्केलचा शक्तीशाली भूकंप; 18 जणांचा मृत्यू तर 500 जण जखमी
या भूकंपात 18 जणांचा मृत्यू झाला असून 500 जण गंभीर जखमी झाले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यामुळे 10 पेक्षा जास्त इमारती कोसळल्या आहेत. त्यामुळे या इमारतीत अनेक तुर्की नागरिक अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत दिलं आहे.
तुर्कस्तानमध्ये (Turkey) शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास 6.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का (Earthquake) बसला आहे. या भूकंपात 18 जणांचा मृत्यू झाला असून 500 जण गंभीर जखमी झाले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यामुळे 10 पेक्षा जास्त इमारती कोसळल्या आहेत. त्यामुळे या इमारतीत अनेक तुर्की नागरिक अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत दिलं आहे.
दरम्यान, तुर्कस्तानचे गृह मंत्री सुलेमान सोयलू यांनी या भूकंपासंदर्भात माहिती देताना सांगितले की, शनिवारी रात्री झालेल्या भूकंपाचे केंद्र तुर्कस्तानमधील पूर्वेकडील एलाजिग प्रांतातील सिवरिस येथे होते. भूकंपाच्या शक्तीशाली हादऱ्यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. सिवरिस येथील अनेक इमारती कोसळल्या असून त्यात अनेकजण अडकल्याची भिती आहे. (वाचा - मुंबई-गोवा महामार्गावर एसटीचा भीषण अपघात; 20 प्रवासी जखमी)
तुर्कस्तानच्या स्थानिक वेळेनुसार, रात्री 8 वाजताच्या सुमारास सिवरिस शहराच्या 10 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. सिवरिस शहरात 40-40 सेकंदांच्या फरकाने तब्बल 60 धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता जास्त असल्यामुळे तुर्कस्तानच्या शेजारील देशातही भूकंपाचे धक्के जाणवले. 1999 मध्ये तुर्कस्तानमध्ये मोठा भूकंप झाला होता. या भूकंपात 18 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.