Kenya Hostel Fire Breaks: केनिया येथील वसतीगृहाला भीषण आग, 17 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 13 गंभीर जखमी
ही आग कशामुळे लागली हे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. या आगीत १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असा संशय व्यक्त केला जात आहे
Kenya Hostel Fire Breaks: केनिया येथील न्यारी काऊंटीमधील हिलसाईट एंडराशा प्राइमरी येथे भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग कशामुळे लागली हे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. या आगीत 17 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असा संशय व्यक्त केला जात आहे आणि 13 जण जखमी झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. स (हेही वाचा- तुर्कीमध्ये दोन अमेरिकन सैनिकांवर हल्ला, 15 जणांना घेतले ताब्यात)
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस प्रवक्ता रेसिला ओनयांगो यांनी सांगितले की, गुरुवारी रात्रीच्या सुमारास न्यारी काउंटीमधील हिलसाईट एंडराशा प्राइमरी येथे आग लागली. ही आग एका वसतीगृहाला लागली आहे. येथे अनेक विद्यार्थी वास्तवास होते. या आगीत अनेक विद्यार्थींचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
आगीची माहिती मिळताच, तात्काळ अग्निशनम दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचाव कार्य सुरु आहे. आग नेमकी कशाने लागली याचे नेमके कारण शोधत आहोत. यावर आवश्यक ती कारवाई करू अशी माहिती पोलिसांनी दिली. आग शाळेच्या निवासी भागात लागली. या शाळांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी राहतात.
अलीकडच्या काळात केनियामध्ये शाळांना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. या घटनेमुळे परिसरातील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीमुळे अनेक शाळांच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होणार असल्याचे भीती पालकांनी व्यक्त केली. आगीच्या या घटनेमुळे शाळाही तात्पुरत्या बंद कराव्या लागणार असल्याचे एकीकडे बोलले जात आहे.