वर्षभर बेपत्ता असणाऱ्या 'ती'चा शोध लागला Porn साईट वर; पोलिसांच्या तपासात समोर आले सत्य

वास्तविक ही मुलगी मागील एका वर्षांपासून बेपत्ता होती अलीकडेच एका पॉर्नसाइट वर तिचे व्हिडीओ समोर येताच पोलिसांना तिचा शोध लागला.

Porn . Image Used for Representational Purpose Only. (Photo Credits: File Image)

15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा लैंगिक छळ करणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणाला फ्लोरिडा (Florida) मध्ये पोलिसांनी अटक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वास्तविक ही मुलगी मागील एका वर्षांपासून बेपत्ता होती अलीकडेच एका पॉर्नसाइट वर तिचे व्हिडीओ समोर येताच पोलिसांना तिचा शोध लागला. या मुलीच्या आईनेच हे व्हिडीओ आणि एका पॉर्न साइटवर तिचे फोटो सर्वात आधी पाहिले होते. न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार, पॉर्नहब (Pornhub) आणि अन्य वेबसाइटवर या मुलीचे साठ हून अधिक अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत, हे व्हिडीओ अपलोड केलेल्या तरुणानेच तिचे अपहरण केले असे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

माध्यमाच्या माहितीनुसार, क्रिस्टोफर जॉनसन या 30 वर्षीय तरुणाने मागील वर्षी या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. यानंतर अनेकदा त्याने तिच्यावर अत्याचार करत त्याचेच अश्लील व्हिडिओ पॉर्नहब सारख्या साईटवर अपलोड केले होते. यासोबतच्या त्याने तिचे नग्न आणि अश्लील फोटो देखील या साईटवर लीक केले होते. पीडितेच्या आईने जेव्हा हेच फोटो आणि व्हिडीओ पहिले तेव्हा तिने थेट पोलिसांत तक्रार केली.

Durex Condom ने दिवाळीच्या निमित्तावर शेअर केलेली जाहिरात पाहून नेटकरी भडकले; ट्विटर वरून व्यक्त केला संताप

दरम्यान, पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत, आरोपी तरुणाच्या गाडीची माहिती मिळवली. ज्यांनंतर एक सापळा रचून त्याला अटक केली. व सोबतच या अल्पवयीन मुलीची देखील सुटका करण्यात आली. पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार ही मुलगी तरुणापासून गरोदर राहिली होती त्यावेळी त्याने गर्भपातासाठी तिच्यावर बळजबरी केली होती. मात्र, याबाबत आरोपीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.