Maldives: मालदीवमध्ये उपचाराअभावी 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; मुइज्जू सरकारने नाकारली भारतीय Air Ambulance ची परवानगी

कारण मुइज्जू सरकारने त्याला एअरलिफ्टसाठी (Airlift) भारताने प्रदान केलेले डॉर्नियर विमान (Dornier Aircraft) वापरण्याची परवानगी नाकारली.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Maldives: गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय लष्कराची छोटी तुकडी मालदीव (Maldives) मध्ये तैनात आहे. तिथल्या मागील सरकारच्या आवाहनावरून भारताने सागरी सुरक्षा आणि आपत्ती निवारण कार्यात मदत करण्यासाठी तेथे सैनिक तैनात केले होते. मात्र आता मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू (President Mohammed Muizzu) यांनी या सैनिकांना देश सोडण्यास सांगितले आहे. या सगळ्या दरम्यान शनिवारी मालदीवमध्ये एका 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. कारण मुइज्जू सरकारने त्याला एअरलिफ्टसाठी (Airlift) भारताने प्रदान केलेले डॉर्नियर विमान (Dornier Aircraft) वापरण्याची परवानगी नाकारली.

मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाला ब्रेन ट्युमर होता. त्याला पक्षाघाताचा झटका आल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर झाली होती. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला गाफ अलिफ विलिंगिली येथील त्याच्या घरातून राजधानी माले येथे नेण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची विनंती केली. (हेही वाचा-India-Maldives row: इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे टूर आणि फ्लाइट ऑपरेटरना मालदीवचे प्रमोशन थांबवण्याचे आवाहन)

मालदीव मीडियाच्या मते, कुटुंबाचा आरोप आहे की अधिकारी तात्काळ वैद्यकीय व्यवस्था करण्यात अपयशी ठरले. मालदीव मीडियाने पीडितेच्या वडिलांच्या हवाल्याने सांगितले की, मुलाला पक्षघाताचा झटका आल्यानंतर आम्ही त्याला माले येथे नेण्यासाठी आयलंड एव्हिएशनला कॉल केला, परंतु त्यांनी आमच्या कॉलला उत्तर दिले नाही. त्यांनी गुरुवारी सकाळी 8:30 वाजता फोनला उत्तर दिले की फक्त एक एअर अॅम्ब्युलन्स करू शकतो. (हेही वाचा - Maldives Suspends Ministers: पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर केलेल्या "आक्षेपार्ह" वक्तव्यामुळे मालदीवच्या मंत्र्यांचे निलंबन)

आपत्कालीन विनंतीनंतर 16 तासांनी मुलाला माले येथे आणण्यात आले. मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांनंतर भारत आणि द्वीपसमूहातील राजनैतिक संबंध बिघडले असताना ही घटना घडली आहे. मुलाच्या मृत्यूवर भाष्य करताना मालदीवचे खासदार मिकेल नसीम म्हणाले, लोकांनी राष्ट्रपतींचा भारताप्रती असलेला वैर पूर्ण करण्यासाठी जीव देऊन त्याची किंमत चुकवू नये.