डोनाल्ड ट्रम्प यांच्या 36 तासांच्या भारत दौऱ्यावर सुरक्षेसाठी 100 कोटींचा खर्च; 25 हजार पोलिस तैनात
ट्रम्प यांच्या या भारत भेटीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ट्रम्प यांच्या दौऱ्याची मोठी तयारी केली आहे. 24 फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया तसेच त्यांची मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर भारतात येत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) 24 आणि 25 फेब्रुवारीला भारतीय दौर्यावर येणार आहेत. ट्रम्प यांच्या या भारत भेटीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ट्रम्प यांच्या दौऱ्याची मोठी तयारी केली आहे. 24 फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया तसेच त्यांची मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर भारतात येत आहेत.
पंतप्रधान मोदींनी ट्रम्प कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी सुमारे 100 कोटींचा खर्च केला आहे. ट्रम्प कुटुंब भारतात आल्यानंतर प्रत्येक क्षणाला 5 टिअर सुरक्षेत असणार आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी 25 हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना आग्रा विमानतळावरुन ताजमहलपर्यंत घेऊन जाण्यासाठी विशेष हेलिकॉप्टर 'मॅरीन वन' तैनात करण्यात आले आहे. तसेच जगातील सर्वोत्तम सुरक्षा असलेली कार कॅडेलिक (बीस्ट) अहमदाबादमध्ये पोहचली आहे. ट्रम्प यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी अमेरिकी सीक्रेट सर्विस यांच्यावर असणार आहे. तसेच एनएसजी, चेतक कमांडो, अर्ध सैनिक बल, आदी मिळून 25 हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत. 36 तासांच्या भारत दौऱ्यासावर ट्रम्प यांच्या सुरक्षिततेसाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. (हेही वाचा - अमेरिका: डोनाल्ड ट्र्म्प यांनी भारत दौर्यापूर्वी दिले व्यापार कराराबाबत मोठे संकेत; भारत- अमेरिकेदरम्यान होऊ शकते मोठे डील)
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्यातले काही अधिकारी त्यांच्या अगोदर भारतात दाखल होऊ शकतात. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद, आग्रा आणि दिल्लीला भेट देणार आहेत. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प ज्या रस्त्यांवरून प्रवास करणार आहेत, त्या रस्त्यांवर अमेरिकन सॅटेलाईटद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. ट्रम्प यांच्या आगमनापूर्वी संपूर्ण रस्त्याची सॅटेलाईट स्क्रीनिंगही केली जाणार आहे. जागतिक पातळीवर डोनाल्ड ट्रम्प यांना महत्त्वाचे स्थान आहे. भारत दौऱ्यावर असताना त्यांची सुरक्षा करणे हे भारताचे कर्तव्य आहे. त्यामुळे मोदी सरकारने डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षितेत वाढ केली आहे.