Millionaire Beggar Woman: आश्चर्यकारक! भिकारी महिलेच्या बँक खात्यात सापडले 1.4 कोटी रुपये

परंतु, भिकाऱ्याकडे 5 इमारती आणि बँकेत 1.4 कोटी रुपये जमा असल्यासचं ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, इजिप्त (Egypt) मध्ये असं घडलं आहे. तिथल्या पोलिसांनी 57 वर्षांच्या महिला भिकाऱ्याला अटक केली आहे. या महिलेच्या नावावर पाच इमारती आणि बँक खात्यात 1 कोटी 42 लाख रुपये जमा असल्याचं उघडकीस आलं आहे.

Beggar- Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: wikimedia commons)

Millionaire Beggar Woman: भिकारी (Beggar) हा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला मनात असहाय्य माणसाची प्रतिमा उमटते. परंतु, भिकाऱ्याकडे 5 इमारती आणि बँकेत 1.4 कोटी रुपये जमा असल्यासचं ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, इजिप्त (Egypt) मध्ये असं घडलं आहे. तिथल्या पोलिसांनी 57 वर्षांच्या महिला भिकाऱ्याला अटक केली आहे. या महिलेच्या नावावर पाच इमारती आणि बँक खात्यात 1 कोटी 42 लाख रुपये जमा असल्याचं उघडकीस आलं आहे. या करोडपती भिकारी महिलेचे (Millionaire Beggar Woman) नाव नफिसा असं आहे. नफिसा भीक मागण्यासाठी आपल्या शारीरिक अंपगत्वाचे कारण देत व्हीलचेयरचा वापर करत होती. परंतु, अनेकदा भीक मागताना ती चालताना दिसली, असा दावादेखील इजिप्तमधील काही नागरिकांनी केला आहे. इजिप्तमधील अनेक राज्यात या महिलेने अंपगत्वाचे कारण सांगत भीक मागितली.

दरम्यान, गल्फ न्यूज डॉट कॉमच्या (gulfnews.com) वृत्तानुसार, या भिकारी महिलेचे इजिप्तच्या बँकेत सुमारे दीड कोटी रुपये आहेत. पोलिसांनी या महिलेला अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे. तसेच स्थानिक वृत्तपत्र Al Masry Al Youm च्या वृत्तानुसार, महिला भिकारी एका व्हीलचेयरवर बसून भीक मागत असे. ती लोकांना आपल्याला एक पाय नसल्याचे दाखवत होती. ती इजिप्तच्या बर्‍याच राज्यांत भीक मागण्यासाठी फिरत असे. (हेही वाचा - Cardless Cash Withdrawals: SBI च्या ATM Card शिवाय काढू शकता रोख रक्कम; जाणून घ्या सुरक्षित पैसे काढण्याची पद्धत)

भीक मागत असताना ही महिला व्हीलचेअरचा वापर करत असे. परंतु, उर्वरित वेळी ती आपल्या पायांवर चालत असे. जेव्हा एका व्यक्तीने या महिलेला पायावर चालताना पाहिलं, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं. या महिलेला कोणताही आजार नसल्याचेही पोलिसांना तपासात निष्पन्न झाले आहे.

भारतातदेखील करोडपती भिकाऱ्यांची प्रकरणे समोर आली होती. वेगवेगळ्या अहवालांनुसार, भारतात अनेक भिकारी, कोट्यावधी असूनही भीक मागत आहेत. जगातील बऱ्याच देशांमध्ये अशी प्रकरणे उघडकीस आली आहेत. खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी लेबनॉनमध्ये एका भिकाऱ्याच्या बँक खात्यात 9 लाख पेक्षा अधिक डॉलर्स असल्याचे निष्पन्न झाले होते.