Zomato Food Delivery Scam: झोमॅटोवरील १००० रुपयांचा फुड ऑर्डर मिळणार केवळ २०० ते ३०० रुपयांत, झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा अजब स्कॅम
तुम्ही झोमॅटोवरुन फुड ऑर्डर करता का? तरी झोमॅटोवरुन फुड ऑर्डर करताना तुम्ही ऑर्डर केलेल्या मेनूची किंमत, रेस्टोरंटचे चार्जेस, डिलिव्हरी चार्जेस, जीएसटी असे विविध गोष्टी लागू होवून तुम्हाला तुमच्या फुड ऑर्डरची फायनल किंमत मोजावी लागते. बरेचदा या फुड ऑर्डरवर तुम्हाला विविध ऑफर आणि मोठी सुट दिल्या जाते पण तरीही झालं तेवढ बील द्यावचं लागतं. तरीही जर १००० रुपयांचा फुड ऑर्डर तुम्हाला केवळ २०० ते ३०० रुपयांत मिळाला तर. झोमॅटोकडून कितीही डिस्काउंट मिळालं तरी एवढं ७० टक्क्यांचं डिस्चाउंट कधीही दिल्या जात नाही. पण खुद्द झोमॅटो फुड डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयने अजब शक्कल लढवली असुन या प्रकारचा घोटळा करत थेट झोमॅटो कंपनीलाचं गंडा घालण्याचं काम झोमॅटो डिलिव्हरी बॉय करत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
एका झोमॅटो कस्टमरने बर्गर किंगमधून जवळपास १००० रुपयांचा फूड ऑर्डर मागवला. दरम्यान या ऑर्डरसाठी कस्टमरने ऑनलाईन पेमेंट केले. तरी जेव्हा फुड डिलिव्हरी बॉय जेव्हा ऑर्डर घेवून आला तेव्हा त्याने कस्टमरला सल्ला दिला की यापुढे एवढा मोठा फुड ऑर्डर असल्यास कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन निवडा. ऑर्डर आल्यावर डिलिव्हरी बॉयला २०० ते ३०० रुपये द्या आणि तुमचा ऑर्डर घ्या. पण तुम्ही ऑर्डर घेतलाचं नाही असं मी कळवेन असं खुद्द डिलिव्हरी बॉय कस्टमरला म्हणाला. (हे ही वाचा:- Digital Transactions: डिजिटल व्यवहारात भारताने रचला इतिहास; अमेरिका, यूके, जर्मनी, फ्रान्सला टाकले मागे)
घडलेला संपूर्ण प्रकार सुजाण झोमॅटो कस्टमरने लिंक्ड इन वर पोस्ट करत झोमॅटोला टॅग केल. यावर थेट झोमॅटोचे सीईओ दिपेंदर गोयल यांनी उत्तर देत म्हणाले, आम्हाला कल्पना आहे अशा प्रकारच्या स्कॅमची. किंबहूना या लुप होलवर काम करण्यास आम्ही सुरुवात केली आहे, अशी माहिती दिपेंदर गोयल यांनी लिंक्ड इनवर दिली आहे.