IPL Auction 2025 Live

YouTube व्हिडिओ पाहण्यासाठी इंटरनेट असूनही Slow Play होतात, करा 'हे' सोप्पे काम

त्यामुळे याचा युजर्सकडून मनोरंजनासाठी खुप वापर केला जातो. यामध्ये लाइव्ह शो ते मुव्ही पाहण्याची सुविधा मिळते.

युट्युब (Photo Credits: Getty Imgaes)

सध्याच्या स्मार्टफोनमध्ये YouTube हे आधीच डाऊनलोड करुन युजर्सला दिले जाते. त्यामुळे याचा युजर्सकडून मनोरंजनासाठी खुप वापर केला जातो. यामध्ये लाइव्ह शो ते मुव्ही पाहण्याची सुविधा मिळते. मात्र काही वेळेस इंटरनेटचा स्पीड उत्तम असूनही यूट्युब वरील व्हिडिओ अगदी स्लो प्ले होतात. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारची समस्या येत असल्यास यावर काही सोप्पे उपाय सुद्धा आहे. याबद्दलच आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत. त्याच्या मदतीने तुम्ही यूट्युब वरील व्हिडिओ अगदी कोणत्याही समस्येशिवाय पाहता येणार आहे.(Identity Theft ची भीती आहे? tafcop.dgtelecom.gov.in वर असे पहा तुमच्या नावावर किती Unauthorised SIMs आहेत आणि त्यापासून सुटका कशी मिळवाल)

स्लो यूट्युब व्हिडिओची समस्या दूर करण्यासाठी सर्वात प्रथम YouTube Cache क्लिअर करा. यासाठी तुम्ही प्रथम क्रोम ब्राउजर येथे जा. तेथे तुम्हाला उजव्या बाजूला तीन बटणांचा ऑप्शन दाखवला जाईल. त्यावर टॅप करा. आता हिस्ट्री ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यास क्लिअर ब्राउजरवर टॅप करा. ऐवढेच नव्हे तर Cache डिलिट होण्यासह व्हिडिओ आधीसारख्याच स्पीडने प्ले होतील.(ऐकावे ते नवलच! WeChat वर नाकात बोटे घालणे, ओठावरून जीभ फिरवणे, डोक्यावर अंडरवेअर घालण्यास बंदी; Tencent ने जारी केले नियम)

त्याचसोबत ऑटो अपडेटचे ऑप्शन सुद्धा बंद करा. खरंतर ऑटो अपडेटच्या कारणामुळे इंटरनेट स्पीड कमी होतो. त्यामुळेच युट्यूब वरील व्हिडिओ स्लो प्ले होतात. जर तुम्ही ते बंद केल्यास आपोआपच इंटरनेटचा स्पीड वाढू शकतो. तर यूट्युबने केल्या वर्षात Shorts अॅप लॉन्च केले होते. युजर्स या मोबाइल अॅपच्या माध्यमातून शॉर्ट व्हिडिओ तयार करुन आपल्या मित्रांना पाठवू शकतात. हे अॅप टिकटॉकच्या ऑप्शनच्या आधारावर उतरवण्यात आले होते.