Xiaomi युजर्सला झटका, भारतातील सर्वाधिक महागड्या स्मार्टफोनची विक्री बंद

त्यानुसार शाओमीने आपल्या प्रीमियम अल्ट्रा स्मार्टफोन Mi 11 Ultra ची विक्री भारतात बंद केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे युजर्सला धक्का बसला आहे.

Xiaomi (Photo Credit: Twitter)

चीनी स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमीने आपल्या भारतीय युजर्सला जोरदार झटका दिला आहे. त्यानुसार शाओमीने आपल्या प्रीमियम अल्ट्रा स्मार्टफोन Mi 11 Ultra ची विक्री भारतात बंद केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे युजर्सला धक्का बसला आहे. कारण हा स्मार्टफोन नुकताच एप्रिल महिन्यात लॉन्च केला होता. तर एमआय 11 Ultra ची विक्री 4 महिन्यानंतर 7 जुलै पासून सुरु करण्यात आली होती. दरम्यान, शाओमीकडून सेलमध्ये कमी स्टॉक उपलब्ध करुन देण्यात आला होता. यामुळेच फोन लवकरच आउट ऑफ स्टॉक झाला होता.

शाओमीने आपले पूर्ण लक्ष नवा फ्लॅगशिप स्मार्टफोनवर करु इच्छित आहे. जो पुढील वर्षात लॉन्च केला जाऊ शकतो. खरंतर शाओमीचे भारतात कमी आणि मिड बजेट असणारे स्मार्टफोन उत्तम कमाई करतात. अशातच कंपनीला याच मार्केट रेंजवर फोकस करायचे आहे. भारतात फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या विक्री संदर्भात शाओमीला अनिश्चितता वाटत आहे. (HONOR X30i आणि HONOR X30 Max लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्सबद्दल अधिक)

Mi 11 Ultra मध्ये 6.8 इंचाचा WQHD+ डिस्प्ले दिला गेला होता. याचे रेजॉल्यूशन 3200X1440 पिक्सल आहे. प्रोटेक्शनसाठी गोरिल्ला ग्लासचा वापर केला आहे. स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड आधारित MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर दिला आहे. त्याचसोबत 128GB आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह हा स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध करुन दिला होता. याची किंमत 69,990 रुपये आहे.

शाओमीच्या या महागड्या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50 MP Samsung GB2 वाइड-अँगल सेंसरसह येणार आहे. या व्यतिरिक्त 48 MP Sony IMX586 अल्ट्रा-वाइड अँगल आणि टेली मॅक्रो कॅमेरा सेंसर ही स्मार्टफोनला दिला आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली असून ती 67W चार्जरसह येणार आहे.