‘या’ स्मार्टफोनमध्ये 31 डिसेंबरपासून WhatsApp होणार बंद!

तसेच जगभरात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु, व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या युजर्ससाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण, आता ठराविक स्मार्टफोनमध्ये हे अॅप चालणार नाही. विंडोज फोन असणाऱ्या ग्राहकांच्या स्मार्टफोनमध्ये 31 डिसेंबरनंतर व्हॉट्सअ‍ॅप कायमचं बंद होणार आहे.

WhatsApp | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

स्मार्टफोनमधील WhatsApp हे अॅप जगभरात लोकप्रिय आहे. तसेच जगभरात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु, व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या युजर्ससाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण, आता ठराविक स्मार्टफोनमध्ये हे अॅप चालणार नाही. विंडोज फोन (Windows Mobile) असणाऱ्या ग्राहकांच्या स्मार्टफोनमध्ये 31 डिसेंबरनंतर व्हॉट्सअ‍ॅप कायमचं बंद होणार आहे.

व्हॉट्स अॅप तांत्रिक कारणामुळे जगभरातील अनेक स्मार्टफोनला सपोर्ट करू शकत नाही. त्यामुळे 1 फेब्रुवारी 2020 पासून iOS 8 व त्यापेक्षा जुन्या ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या आयफोन आणि 2.3.7 किंवा त्याहून जुने व्हर्जन असलेल्या अँड्राइड फोनमध्ये व्हॉट्स अ‍ॅप चालणार नाही, अशी माहिती व्हॉट्स अ‍ॅपची मालकी असलेल्या फेसबुकने दिली आहे. काल रात्रीपासून अनेक स्मार्टफोन धारकांना मेसेज पाठवण्यात अडचणी येत होत्या. (हेही वाचा - 2021 मध्ये येणार Apple चा संपूर्णपणे Wireless iPhone)

व्हॉट्सअ‍ॅपने घेतलेल्या या निर्णयांचा परिणाम जास्त युझर्सवर होणार नाही. परंतु, जे युजर्स खूपच जुने अँड्रॉईड स्मार्टफोन आणि आयफोन वापरत असतील, अशा युजर्सनाचं बसणार आहे. तसेच 4.0.3 किंवा iOS 8 पेक्षा वरचे व्हर्जन वापरणाऱ्या आयफोन युझर्सला याचा तोटा होणार नाही, असंही व्हॉट्सअॅपने स्पष्ट केलं आहे. पंरतु, Windows फोनमध्ये WhatsApp 31 डिसेंबर 2019 नंतर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही.