Android आणि iOS च्या 'या' स्मार्टफोन्सवर 1 नोव्हेंबर पासून चालणार नाही WhatsApp; येथे पहा संपूर्ण यादी
अॅपची सुरक्षितता आणि युजर्सची प्रायव्हसी कायम ठेवण्यासाठी इन्स्टंट मेसेजिंग अॅप यापुढे Android आणि iOS च्या जुन्या व्हर्जनवर सपोर्ट करणार नाही.
1 नोव्हेंबर 2021 पासून व्हॉट्सअॅप (WhatsApp) काही स्मार्टफोनवर (Smartphone) काम करणे बंद करेल. अॅपची सुरक्षितता आणि युजर्सची प्रायव्हसी कायम ठेवण्यासाठी इन्स्टंट मेसेजिंग अॅप यापुढे अॅनरॉईड (Android) आणि आयओएस (iOS) च्या जुन्या व्हर्जनवर सपोर्ट करणार नाही. जी ऑपरेटिंग सिस्टम सर्वात जास्त यूजर्स वापरतात, अशा ऑपरेटिंग सिस्टमवर (Operating System) व्हॉट्सअॅप लक्ष केंद्रित करत आहे. जुने स्मार्टफोन नवीन व्हॉट्सअॅप फिचर्सना योग्यरित्या सपोर्ट करू शकणार नाहीत, असे कंपनीचे म्हणणे आहे.
जुन्या स्मार्टफोनवर युजर्सची गोपनीयता धोक्यात येण्याची शक्यता आहे. अॅनरॉईड ऑपरेटिंग सिस्टम 4.1, आयओएस 10 आणि त्यावरील आवृत्तीच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप अगदी सुरळीत चालेल. परंतु, यापेक्षा जुनी ऑपरेटिंग सिस्टीम असणाऱ्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाहीत. (हे ही वाचा: WhatsApp चे iOS युजर्ससाठी लवकरच येणार Message Reaction फीचर)
अॅनरॉईड व्हर्जन कसे तपासावे?
# तुमच्या फोनचे सेटिंग अॅप उघडा.
# "System" वर टॅप करा
# "Advanced" वर क्लिक करा
# "System update" वर जा.
# तुम्हाला तुमच्या मोबाईलचे अँड्रॉइड व्हर्जन दिसेल.
IOS व्हर्जन कसे तपासावे?
# "Settings" वर क्लिक करा
# "General" मध्ये जा,
# नंतर "About" वर टॅप करा.
# तुम्हाला तुमच्या iOS व्हर्जन दिसेल.
येथे पहा 1 नोव्हेंबरपासून व्हॉट्सअॅप न चालणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी:
iPhones:
iPhone 6S
iPhone 6S Plus
Apple iPhone SE (1st generation)
Samsung:
Samsung Galaxy Trend Lite
Galaxy SII
Galaxy Trend II
Galaxy S3 mini
Galaxy core
Galaxy xcover 2
Galaxy ace 2LG Lucid 2
Optimus L5 double
Optimus L4 II Double
Optimus F3Q
Optimus f7
Optimus f5
Optimus L3 II Double
Optimus f5
Optimus L5
Optimus L5 II
Optimus L3 II
Optimus L7
Optimus L7 II Double
Optimus L7 II
Optimus f6
Enact
Optimus f3
Optimus L4 II
Optimus L2 II
Optimus Nitro HD and 4X HD
ZTE:
ZTE Grand S Flex
Grand X Quad V987
ZTE V956
Big memo
Huawei:
Huawei Ascend G740
Ascend D Quad XL
Mate Ascension
Go up P1 S
Go up D2
Ascension D1 Quad X
व्हॉट्सअॅप चालणार नाही अशा ऑपरेटिंग सिस्टमची यादी तपासण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅप FAQ विभागाकडे जाऊ शकता. अॅनरॉईड आणि आयओएस युजर्स मोबाईल फोन सेटिंग्जमध्ये जाऊन ते वापरत असलेले सॉफ्टवेअरचे व्हर्जन तपासू शकतात. व्हॉट्सअॅप सपोर्ट न करणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये "अँड्रॉइड 4.0.3 आईस्क्रीम सँडविच", "iOS 9", "KaiOS 2.5.0" चा समावेश आहे.