WhatsApp वरील खास मेजेस 'या' सोप्या ट्रिकने करा सेव्ह
तसेच हे अॅप युजर्सफ्रेंडली बनवण्याचा व्हॉट्सअॅपकडून नेहमीच प्रयत्न केले जातात.
व्हॉट्सअॅप (WhatsApp) नेहमीच त्यांच्या युजर्ससाठी दरवेळी नवीन फिचर्स घेऊन येत असते. तसेच हे अॅप युजर्सफ्रेंडली बनवण्याचा व्हॉट्सअॅपकडून नेहमीच प्रयत्न केले जातात. तर काही वेळेस युजर्सला व्हॉट्सॅपवरील खास मेसेज सेव्ह कसा करायचा ते पटकन कळून येत नाही. अशावेळी मोबाईलमधून त्या मेसेजचा स्क्रिनशॉट काढला जातो.
परंतु आता स्क्रिनशॉट काढण्यापेक्षा युजर्स तो खास मेसेज सेव्ह करु शकणार आहे. तसेच खास मेसेजसाठी बुकमार्क हा ऑप्शनसुद्धा युजर्सला देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवरील खास मेसेज सेव्ह करायचा असल्यास 'या' सोप्या ट्रिकचा वापर करा.
- सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरु करा.
- तुम्हाला हवा असलेला मेसेज ज्या ग्रुप चॅट किंवा प्रायव्हेट चॅट मध्ये आहे तेथे जा.
- चॅटमध्ये गेल्यानंतर जो काही खास मेसेज आहे त्यावर काही वेळ होल्ड करा. होल्ड केल्यानंतर चॅटवर काही ऑप्शन दाखवले जातील.
- त्यानंतर तेथे बॉक्समध्ये वरच्या दिशेला स्टारचा एक आयकॉन दिसेल त्यावर टॅप करा.
- स्टार केल्यानंतर तो खास मेसेज सेव्ह होईल.
(हेही वाचा-Whatsapp मध्ये येणार एक जबरदस्त फीचर, जे सांगेल एक मेसेज किती वेळा झाला आहे फॉरवर्ड)
तर वरील सोप्या पद्धतीचा वापर करुन तुम्ही खास मेसेज सेव्ह करु शकता. तसेच व्हॉट्सअॅपवर एक मेसेज किती वेळा फॉरवर्ड झाला आहे हे सांगणारे जबरदस्त फिचर्स लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे.