WhatsApp Shopping Button: भारतासह जगभरात उपलब्ध झाले व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन शॉपिंग बटण; चॅटमधून कॅटलॉग पाहून थेट खरेदी करू शकाल प्रॉडक्ट 

या बटणामुळे लोकांना थेट चॅटमधून उपलब्ध उत्पादने तपासून पाहणे व ती खरेदी करण्यास मदत मिळणार आहे.

WhatsApp Shopping Button (Photo Credits; Twitter)

मंगळवारी फेसबुकने (Facebook) भारतासह जगभरात व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) एक नवीन शॉपिंग बटण (Shopping Button) तयार केले. या बटणामुळे लोकांना थेट चॅटमधून उपलब्ध उत्पादने तपासून पाहणे व ती खरेदी करण्यास मदत मिळणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे हे टूल 'बिझनेस कॅटलॉग' शोधणे सुलभ करेल जेणेकरुन ते कोणत्या वस्तू किंवा सेवा ऑफर करतात हे समजले. यापूर्वी, बिजनेस कॅटलॉग आहे की नाही हे पाहण्यासाठी लोकांना बिझनेस प्रोफाइलवर क्लिक करावे लागत असे. व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन शॉपिंग बटणे समाविष्ट केल्यामुळे, बिझनेस खाते असणारे वापरकर्ते त्यांच्या ग्राहकांना थेट चॅट विंडोवर उत्पादनाची यादी देऊ शकतील. हा कॅटलॉग पाहिल्यानंतर वापरकर्त्यांना चॅटच्या माध्यमातून खरेदी करण्याचा पर्यायही देण्यात येईल.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, व्हॉट्सअॅप शॉपिंग बटण अपडेट करण्यात आले आहे. अ‍ॅपमध्ये स्टोअरफ्रंट चिन्ह म्हणून वापरकर्त्यांना हे नवीन बटण दिसेल. हे नवीन शॉपिंग बटण आहे. हे बटन दाबून, संबंधित बिझनेसचा संपूर्ण कॅटलॉग पहिला जाऊ शकतो. यासह एखाद्या उत्पादनावर क्लिक करुन ते खरेदी करण्यासाठी चॅट सुरू करता येईल.

व्हॉट्सअ‍ॅपचे म्हणणे आहे की, या नवीन बटणामुळे व्यवसायांना त्यांची उत्पादने शोधणे सोपे होईल आणि त्यामुळे विक्री वाढण्यास मदत होईल. एका अंदाजानुसार व्हॉट्सअ‍ॅप बिझिनेस खात्यातून दररोज 175 दशलक्षाहूनही अधिक लोक मेसेज करतात आणि दरमहा सुमारे 40 दशलक्ष लोक बिझनेस कॅटलॉग पाहतात. यामध्ये 3 दशलक्षाहून अधिक भारतीयांचा समावेश आहे. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतातील 76 टक्के तरुणांनी सांगितले की, त्यांना अशा कंपनीबरोबर निझानेस करायला आवडेल ज्यांच्यासोबत ते थेट चॅटमधून संवाद साधू शकतील. (हेही वाचा: Paytm Loan: व्यवसाय क्षेत्रासाठी आनंदाची बातमी; कोणत्याही गॅरंटीशिवाय पेटीएम देणार 1 हजार कोटींचे कर्ज)

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन शॉपिंग बटण सध्या जगभरात उपलब्ध झाले आहे, जे व्हॉईस आणि कॉल बटणाद्वारे बदलले जाऊ शकते. वापरकर्त्यांना व्हॉईस आणि कॉल बटण शोधण्यासाठी कॉल बटणावर क्लिक करावे लागेल आणि व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल पर्याय निवडावे लागेल. फेसबुकने म्हटले आहे की, आता त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपच फॉर बिझनेस वापरुन कंपन्यांकडून शुल्क आकारण्यास सुरवात केली आहे. यामुळे वापरकर्त्यांना उपलब्ध उत्पादने तपासून घेणे आणि चॅटमधून खरेदी करणे सोपे जाईल.