WhatsApp कडून Emoji Reaction चं फीचर आऊट; पहा मेसेज ला प्रतिसाद देताना इमोजी रिकॅक्शन कशा वापराल?
व्हॉट्सअॅप वर इमोजी रिअॅक्शन त्याचप्रमाणे काम करते जसे ते इंस्टाग्राम, टेलिग्राम वर आहे
अनेक मेसेजिंग अॅप वर तुमच्या मेसेजला आता प्रतिसाद देण्यासाठी इमोजी असतात. फेसबूक मेसेंजर युजर्स प्रमाणे मेटा ने आता ही सोय व्हॉट्सअॅप (WhatsApp) युजर्सला देखील दिली आहे. मार्क झुकरबर्ग ने फेसबूक वर माहिती देत आता व्हॉट्सअॅप रिक्शन ( Emoji Reaction) फीचर रोलआऊट केल्याची माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपने सुरूवातीच्या टप्प्यामध्ये 6 इमोजी रोलआऊट केल्या आहेत. यामध्ये थम्प्स अप, हार्ट, स्मायली, सरप्राईज, थॅक्स आणि सॅड फेस इमोजींचा समावेश आहे. मार्क झुकरबर्गने आगामी काळात अजून काही इमोजी लॉन्च करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
व्हॉट्सअॅप वर इमोजी रिअॅक्शन त्याचप्रमाणे काम करते जसे ते इंस्टाग्राम, टेलिग्राम वर आहे. मग आता पहा व्हॉट्सअॅप वर हे व्हॉट्सअॅप रिक्शन फीचर कसं वापरता येईल?
- व्हॉट्सअॅप रिक्शन फीचर वापरण्यासाठी चॅट ओपन करा.
- ज्या मेसेजवर तुम्हांला प्रतिक्रिया द्यायची आहे तो मेसेज प्रेस करून होल्ड करा.
- यानंतर तुम्हांला 6 इमोजींचा पॉप अप दिसेल. याद्वारा तुम्ही रिअॅक्शन देऊ शकाल.
- तुम्हांला 6पैकी जी रिअॅक्शन द्यायची असेल त्याची निवड करा.
- इमोजी सिलेक्ट केलेल्या टेक्सच्याखाली दिसेल.
हे देखील नक्की वाचा: WhatsApp कडून एकावेळी Group Voice Call मध्ये 32 जण होऊ शकतात सहभागी, File Sharing क्षमता 2GB .
व्हॉट्सअॅप कडून सध्या अनेक फीचर्सची टेस्टिंग सुरू आहे. येत्या काही अपडेट्समध्ये अॅडमीनला ग्रुप मधील मेसेज डिलीट करण्याची मुभा मिळणार आहे. तसेच 2 जीबी फाईल शेअरिंगचा पर्याय मिळेल. पोल फीचर देख़ील लवकरच व्हॉट्सअॅप वर मिळू शकेल.