WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅप वर अनावश्यक चॅट टाळण्यासाठी त्याचा आवाज करा 'कायमचा Mute', फॉलो करा या सोप्या स्टेप्स
थोडक्यात म्यूट करू करता. तसा हा पर्याय आधीपासून होता ज्यात तुम्हाला त्या व्यक्तीचे चॅट किती दिवसांसाठी किती महिन्यांसाठी म्यूट ठेवण्याचे पर्याय होता. मात्र आता त्यात Always म्हणजेच कायमचे चॅट म्यूट करण्याचा पर्याय आला आहे.
आपल्या पासून दूर असणा-या प्रियजनांशी कायम संपर्कात राहण्यासाठी सध्याच्या काळात सोशल मिडिया हा एक उत्तम पर्याय ठरला आहे. यात व्हॉट्सअॅप (WhatsApp) तर जणू प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपले रोजचे संभाषण, ऑफिसचे काम, मुलांचे क्लासेस अशा अनेक गोष्टी व्हॉट्सअॅप चॅट मधून करणे सोपे आले. या व्हॉट्सअॅपमुळे जग जवळ आले आहे असे म्हणायला हरकत नाही. असे असताना अनेकदा काहींना अनावश्यक चॅट्सचा देखील सामना करावा लागतो. अनेकदा आपल्याला एखाद्याशी बोलायचे नसेल वा आपला नंबर एखाद्या अनोळखी माणसाकडे गेला असेल तर त्यांचे अनावश्यक चॅट आपल्याला सहन करावे लागते. अशा वेळी अनेकदा ग्रुपमधील चॅट्सचा भडिमारही आपल्याला सहन करावा लागतो. त्यामुळे आता व्हॉट्सअॅपने एक नवे फिचर (WhatsApp New Feature) आणले आहे.
या फिचरच्या माध्यमातून तुम्ही एखाद्याला ब्लॉक न करता त्याचे चॅट नकळत कायमचे बंद करू शकता. थोडक्यात म्यूट (Mute) करू करता. तसा हा पर्याय आधीपासून होता ज्यात तुम्हाला त्या व्यक्तीचे चॅट किती दिवसांसाठी किती महिन्यांसाठी म्यूट ठेवण्याचे पर्याय होता. मात्र आता त्यात Always म्हणजेच कायमचे चॅट म्यूट करण्याचा पर्याय आला आहे. WhatsApp मध्ये व्हिडिओ, फोटोजचा GIF बनवून फाईल कशी पाठवलाल?
Always म्यूट चॅट पर्याय निवडण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स
1. तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप उघडा.
2. तुम्हाला जो चॅट म्यूट करायचा असेल तो चॅट उघडा.
3. त्या व्यक्तीच्या नावावर वा ग्रुपवर क्लिक करा
4. त्यानंतर आलेल्या Mute पर्यायवर क्लिक करा.
5. यात तुम्हाला 3 पर्याय दिसतील.
6. त्यातील Always पर्यायावर क्लिक करा.
ह्याच स्टेप्स तुम्हाला WhatsApp Web साठी करायच्या आहेत. यामुळे तुम्ही त्या व्यक्तीच्या वा ग्रुपच्या नकळत तुम्ही त्यांचे चॅट कायमचे म्यूट थोडक्यात आवाज कायमचा बंद करू शकता. असाच पर्याय तुम्हाला एखाद्याचे स्टेटस म्यूट करण्यासाठी देखील देण्यात आले. ज्याच्या स्टेटसचा तुम्हाला पाहून कंटाळा आला असेल त्याला तुम्ही म्यूट करू शकता.