WhatsApp Always Mute Feature: व्हॉट्सअॅपच्या अनावश्यक नोटिफिकेशनला मिळणार कायमची सुट्टी; 'हे' फिचर्स ठरणार उपयुक्त

आतापर्यंत, युजर्संकडे वापरकर्ता किंवा एखाद्या ग्रुपला 8 तास, एक दिवस किंवा एक वर्षासाठी म्यूट करण्याचा पर्याय होता. आता यात आणखी एक नवीन पर्याय जोडण्यात आला आहे.

WhatsApp (Photo Credits: Pixabay)

WhatsApp Always Mute Feature: जगभरातील कोट्यावधी वापरकर्ते लोकप्रिय व्हॉट्सअॅपचा वापर करतात. परंतु, व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या सर्वच मॅसेजना तुम्ही प्रत्युत्तर देणं आवश्यक नसतं. कधी कधी अनावश्यक मॅसेजचे नोटिफिकेशन तुम्हाला त्रासदायी ठरतात. बऱ्याचदा तुम्ही अशा ग्रुपमध्ये किंवा कौटुबिंक ग्रुपमध्ये अॅड असतात, की ज्यातील संदेश आपल्यासाठी उपयुक्त नसतात. अशा परिस्थितीत त्या ग्रुपचं नोटिफिकेशन म्यूट करण्याचं ऑपशन आपल्याकडे असतं. मात्र, आता त्यात आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅपशी संबंधित अपडेट शेअर करणाऱ्या WABetaInfo ने म्हटले आहे की, लवकरच युजर्संना व्हॉट्सअॅपवर उर्वरित वापरकर्त्यांना कायमचे म्यूट करता येणार आहे. आतापर्यंत, युजर्संकडे वापरकर्ता किंवा एखाद्या ग्रुपला 8 तास, एक दिवस किंवा एक वर्षासाठी म्यूट करण्याचा पर्याय होता. आता यात आणखी एक नवीन पर्याय जोडण्यात आला आहे. या पर्यायाला Mute Always असे नाव देण्यात आले. सध्या या फिचर्सची बीटा वापरकर्त्यांसह चाचणी घेण्यात येत आहे आणि पुढील काही आठवड्यांत ती प्रत्येक युजर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Email Sending Tips: ईमेल पाठवताना स्क्रिनवर दिसणारे To, Ccआणि Bcc याचा अर्थ काय? जाणून घ्या सविस्तर)

हे नवीन फिचर्स Android अॅपच्या बीटा आवृत्ती 2.20.201.10 मध्ये देण्यात आलं आहे. या फिचर्सच्या मदतीने वापरकर्ते एखाद्या ग्रुपच्या नोटिफिकेशनला कायमचं बंद करू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला म्यूट केलेले कॉन्टॅक किंवा ग्रूप मॅसेज प्राप्त झाल्यानंतर नोटिफिकेशन आलं नाही, तरी तुम्हाला हे संदेश नंतर अॅप उघडून वाचता येऊ शकतात. सध्या, अँड्रॉइड अॅपची बीटा आवृत्ती बर्‍याच काळापासून चाचणी घेत आहे आणि लवकरच सर्व वापरकर्त्यांना हे फिचर्स वापरता येणार आहे. असं म्हटलं जातय की, iOS व्हर्जनवर वापरकर्त्यांना हे फिचर्स अपडेट मिळू शकते.

म्यूट करण्याचा पर्याय बर्‍याच काळापासून वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. या फिचर्सच्या मदतीने वापरकर्त्यास ब्लॉक न करता नोटिफिकेशनपासून सुटका करता येणार आहे. चॅट किंवा ग्रुप म्यूट करण्यासाठी व्हॉट्सअॅप उघडा आणि वरच्या बाजूस उजवीकडे दर्शविलेल्या 'Mute Notifications' पर्यायावर टॅप करा. नवीन फिचर्स प्राप्त झाल्यावर, येथे आपल्याला 8 तास, 1 दिवस आणि 1 वर्षाऐवजी नेहमीचं (always) असे पर्याय दिसतील. यातील always पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीच्या किंवा ग्रुपच्या नोटिफिकेशनच्या त्रासापासून सुटका मिळेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif