WhatsApp | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

तुम्ही जर व्हॉट्सॲप (WhatsApp ) वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरु शकते. व्हॉट्सॲप एक नवे फिचर घेऊन आले आहे. या फिचरच्या माध्यमातून आपण आपल्या व्हॉट्सॲपमधील मेसेज (WhatsApp Message) आपोआप Enable करु शकता. तेही आपण ठरवून दिलेल्या कालावधीनुसार. होय, आतापर्यंत हे शक्य नव्हते. पण, आता नव्या फिचर्सच्या मदतीने हे शक्य होणारआहे. व्हॉट्सॲपमध्ये 'डिसअपरिंग मेसेजेस' ( Disappearing Messages) असे एक फिचर आहे. हे फिचर आपल्या फोनची इंटरनल मेमरी वाजविण्यासाठी मदत करते. हे फिचर वापरण्यासाठी युजरला आपल्या व्हॉट्सॲप सेटींग्जमध्ये जाऊन Enable किंवा Disable पर्याय वापरावा लागतो. याचा फायदा असा होतो की, काही वेळाने तुमच्या चॅटवरील मेसेज आपोआप डीलिट होतो. त्यामुळे आपल्या फोनची मेमरी जास्त वापरली जात नाही आणि आपला फोनही स्लो होत नाही.

Whatsapp ने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा आपण Disappearing Messages फीचर इनेबल (Enable) करता तेव्हा आपल्याला कालावधीही निश्चित करावा लागतो. हा कालावधी 24 तास, 7 दिवस किंवा 90 दिवसांचा असतो. यापैकी एक कालावधी निश्चित केल्यानतर संबंधित संदेश आपल्या फोनमधून आपोआप डीलिट होऊन जातील. दरम्यान, ही सूचना केवळ त्याच संदेशांना लागू राहील जे हे फीचर कार्यरत केल्या नंतरच्या संदेशांनाच लागू राहील.

Android किंवा iPhone मध्ये Disappearing Messages कसे ऑन कराल?

सर्वात प्रथम तुमचे व्हॉट्सॲप चॅट (WhatsApp Chat) ओपन करा. त्यानंतर एक नाव निवडा.जे तुम्हाला हवे आहे. त्यानंतर Disappearing Messages वर टॅप करा. आता तुम्हाला 24 तास, 7 दिवस किंवा 90 दिवस यांपैकी एक कालावधी निवडायचा आहे. तो निवडल्यानंतर हे फिचर तुमच्या व्हॉट्सॲप वर कार्यरत होईल. (हेही वाचा, WhatsApp ने एका महिन्यात 20 लाखांहून अधिक भारतीय युजर्सचे केले बंद अकाउंट्स, जाणून घ्या कारण)

Android किंवा iPhone मध्ये Disappearing Messages कसे बंद कराल?

Disappearing Messages ऑन केल्यानंतर त्याचॅटचे मेसेज स्वत:हून डिलीट न होण्यासाठी व्हॉट्सॲप चॅट (WhatsApp Chat) ओपन करा. त्यानंतर नावावर टॅप करा. आता Disappearing Messages वर टॅप करा आणि ते बंद करा.

व्हॉट्सॲप युजर एखाद्या इंडिज्यूअल चॅटसाठीही ऑन किंवा ऑफ करु शकतात एखाद्या व्हॉट्सॲप ग्रुपसाठीही हा पर्याय वापरता येऊ शकतो. याशिवाय ग्रुप अॅडमीनही Disappearing Messages हे फिचर वापरु शकतात. ग्रुपवर हे Disappearing Messages फिचर ऑन केल्यास एखाद्या ग्रुप सदस्याने हा मेसेच विशिष्ट दिवसात वाचला नाही तर तो त्याच्या नकळत निश्चित कालावधीत डीलिटही होऊ शकतो.