Whatsapp Dark mode Feature: Android, iOS युजर्ससाठी व्हॉट्सऍपचे नवे डार्क मोड फिचर लॉन्च; जाणून घ्या अपडेट करण्याची पद्धत

व्हॉट्सअॅपने गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या वापकर्त्यांसाठी डार्कमोड फिचर (Whatsapp Dark mode Feature) आणले होते. परंतु, निवडक लोकांना डार्क मोड फिचरचा आनंद मिळवता येत होता. मात्र, आता व्हॉट्सअॅपने आपले डार्क मोड फिचर सर्व अॅन्ड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) युजर्ससाठी अपडेट केले आहे.

व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे आपल्या अॅपमध्ये सतत बदल करुन वापरकर्त्यांना नवा अनुभव देण्याचा प्रयत्न करतात. व्हॉट्सअॅपने गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या वापकर्त्यांसाठी डार्कमोड फिचर (Whatsapp Dark mode Feature) आणले होते. परंतु, निवडक लोकांना डार्क मोड फिचरचा आनंद मिळवता येत होता. मात्र, आता व्हॉट्सअॅपने आपले डार्क मोड फिचर सर्व अॅन्ड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) युजर्ससाठी अपडेट केले आहे. यामुळे एन्ड्रॉइड आणि आयओएस वापरकर्तेही डार्क मोड फिचरचा वापर करू शकतात. यासाठी व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना गूगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड किंवा अपडेट करावे लागणार आहे. व्हॉट्सअॅपचा वापरकर्त्यांच्या डोळ्याला जास्त त्रास होऊ नये म्हणून डार्क मोड फिचर लॉन्च करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीनी दिली आहे. तसेच मोबाइलचा ब्राइटनेसचा कमी वापर करावा लागेल.

मिळालेल्या माहितीनुसार, 'एन्ड्रॉइड 10 आणि आयओएस 13 चे वापरकर्ते याला डिफॉल्ट म्हणूनही सेट करू शकतात. तसेच मीडिया रिपोर्टनुसार असे दिसून आले आहे की, सध्या काही लोक व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतरही हे फिचर वापरू शकत नाहीत. तसेच व्हॉट्सअपमधील डार्क फिचर कशा पद्धतीने आपल्या स्मार्टफोनमध्ये वापरता येईल, याची योग्य माहिती नसल्याने अनेकांचा गोंधळ उडतो. यासाठीच खालील माहिती  अॅन्ड्राईड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. हे देखील वाचा- Poco X2 चा फ्लॅश सेल आज दुपारी 12 पासून सुरु Flipkart सुरु; आकर्षक ऑफर्स सह मोबाईल खरेदी करण्याची संधी

ट्वीट- 

आयओएस आणि अॅन्ड्रॉइड 10 वापरकर्त्यांसाठी-

- सर्वात आधी व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट वर्जन अपडेट/डाऊनलोड करा.

- त्यानंतर 'मोबाइल सेटिंग्स' हा ऑप्शन सिलेक्ट करा.

- येथे डिस्प्ले आणि ब्राइटनेसचा ऑप्शन सिलेक्ट करा.

- त्यानंतर डार्क मोड सुरू करा.

- मोबाइलमध्ये डार्क मोड ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर व्हॉट्सअॅप डार्कमोडचं फिचर मोबाइलमध्ये अॅक्टिव्हेट होइल.

अॅन्ड्रॉइड 9 आणि त्याआधीचे वापरकर्त्यांसाठी-

- सर्वात आधी व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट वर्जन डाउनलोड करा किंवा अपडेट करा.

- त्यानंतर व्हॉट्सअॅप सेटिंग्समध्ये जा.

- त्यानंतर चॅटमध्ये जाऊन थीम ऑप्शन सिलेक्ट करा.

- डार्क मोड ऑप्शन सिलेक्ट करा.

भारतात व्हॉट्सअपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. व्हॉट्सअॅप 2009 साली भारतात ऍन्ट्री केली होती. त्यानंतर खूप कमी वेळात व्हॉट्सअपने लोकांची पसंती मिळवली होती. सध्या व्हॉट्सअपचे 400 दक्षलक्षांहून अधिक वापरकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे.