WhatsApp वर चॅट करताना Voice Message, GIF पाठवत असाल तर 'या 5' हटके ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा

WhatsApp | Representative Image | (Photo Credits: IANS)

फेसबुक (Facebook)  कंपनीच्या WhatsApp या मेसेजिंग ऍपची जादू आता सर्वत्र पसरली आहे.  अगदी मॅसेज लिहिता येत नसेल तर व्हॉइस मॅसेज (Voice Message)  पासून ते तुमच्या इमोशन्सला साजेश्या अश्या GIFs पर्यंत सारं काही आपल्याला एका क्लिकवर WhatsApp च्या माध्यमातून पाठवता येतं.आपल्या या नानाविध युजर्सची आवड आणि गरज लक्षात घेऊन WhatsApp नेहमीच काही ना काही भन्नाट फीचर्स घेऊन पुढे येत असते. पण अलीकडे फोनला अनलॉक करण्याच्या पद्धती पासूनच इतक्या प्रकारच्या पद्धती बघायला मिळतात की त्यामध्ये  एखादे फीचर आपल्या नजरेतून सुटून जाते. तुमच्या WhatsApp मध्येही अशी काही खास फीचर्स आहेत जी कदाचित आतापर्यंत तुमच्या लक्षातही आली नसतील, पण चिंता करण्याचे काहीच कारण नाही, आम्ही आपल्याला अशाच 5  हटके फीचर्सची ही खास माहिती देणार आहोत..

चला तर मग पाहुयात नेमकं WhatsApp मध्ये आहे काय..

Video चा बनवा GIF

जर का तुम्हाला स्वतःचे काही खास GIF पाठवायचे असतील तर तुम्ही तुमच्या फोनच्या कॅमेऱ्यातून हवे ते क्षण व्हिडीओ रूपात शूट करा आणि मग लगेचच वरील उजव्या बाजूला असणाऱ्या GIF हा पर्याय निवडा. यामध्ये तुम्ही शूट केलेल्यापैकी किती वेळाचे शूटिंग पाठवायचे आहे हे देखील तुम्ही निश्चित करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला तुमचा खास टच असलेले GIF पाठवता येतील.

Voice Note चा आवाज करा कंट्रोल

बऱ्याचदा तुम्ही इयरफोन किंवा हेडफोन घरी विसरला असाल आणि अशावेळी तुम्हाला एखादी व्हॉइस नोट आली तर नेमकी पंचाईत होऊन बसते पण तुम्ही तेव्हा सुद्धा अगदी बिधास्त हा मॅसेज ऐकू शकता. तुम्हाला इतकंच करायचं आहे की, व्हॉइस नोट ऐकताना फोन तुमच्या कानाच्या अगदी जवळ न्या जेणेकरून WhatsApp हा आवाज तुमच्या फोनच्या स्पीकर मधून न पाठवता केवळ तुम्हाला ऐकू जाईल इतका कमी करेल. (फेसबुकला माहिती आहे तुम्ही SEX कधी केला होता! काही अॅप लीक करतायत तुमची माहिती)

मोबाईल डेटा आणि फोनची मेमरी वाचवा

अनेकवेळा तुमच्या फोनमध्ये तुमच्या नकळत अनेक फोटो WhatsApp मधून डाउनलोड होत असतात यामध्ये फोनचा डेटा तर वाया जातोच सोबतच मेमरी सुद्धा विनाकारण भरून जाते, अशा वेळी तुम्हाला फक्त सेटिंग्समध्ये जाऊन मीडिया ऑटो डाउनलोड हा ऑप्शन बंद करायचा आहे. तसेच तुम्ही जेव्हा वायफायशी जोडलेले असाल तेव्हा तुम्ही हे ऑटो डाउनलोड पुन्हा सूर करू शकता

WhatsApp स्टोरी करा फेसबुकवर शेअर

तुम्हाला तुमची WhatsApp स्टोरी जर का फेसबुकवर शेअर करायची असल्यास क्रिएट स्टेटस पर्याय निवडा त्यामध्ये माय स्टेटस या पर्यायात जाऊन तिथून Share To Facebook Story हा पर्याय निवडा यानंतर तुमची स्टोरी थेट फेसबुकवरही शेअर झालेली असेल. (iPhone युजर्स आता Facebook, WhatsApp वरुन कॉल करु शकणार नाहीत?)

 

WhatsApp मेसेजला पर्सनल टच

WhatsApp मध्ये तुम्ही मेसेज करताना त्याला तुमचा पर्सनल टच देऊन फॅन्सी बनवू शकता यासाठी तुम्हाला मेसेज ठळक, इटॅलिक किंवा मध्ये काठ मारण्याचा पर्याय दिला जातो. जर का तुम्हाला शब्दावर काठ मारायची असेल तर त्या शब्दाचं दोन्ही बाजूस टाइड चिन्हे ऍड करा. तर बोल्ड करायचे असल्यास दोन्ही बाजूस '*' हे चिन्ह आणि इटॅलिक साठी दोन्ही बाजूस अंडरस्कोर (_)टाका.

ही माहिती तुम्ही प्रत्यक्ष वापरून यापुढे चॅट करताना अधिक सहजपणे टायपिंग, व्हिडीओ किंवा व्हॉइस नोट पाठवू शकता. अशा प्रकारचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत राहा लेटेस्टली मराठी!

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now